मुंबईदि. 27 : राज्यात भारत राखीव बटालियनच्या दोन केंद्रांची (आय.आर.बी.) स्थापना करण्यास मान्यता मिळाली असून त्यापैकी एक बटालियन अहमदनगर जिल्ह्यात स्थापन होणार आहे. या बटालियन साठी जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करावी,अशा सूचना जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालक मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज दिल्या.
अहमदनगर जिल्ह्यात भारत राखीव बटालियनचे केंद्र स्थापन करण्याच्या अनुषंगाने प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस गृहराज्यमंत्री दिपक केसरकरराज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक सुरेश मेखलाअहमदनगरचे अपर जिल्हाधिकारी बी.एच. पालवेगृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड उपस्थित होते.
भारत राखीव बटालियनचे केंद्र स्थापन करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कुसडगाव (ता.जामखेड) येथील 40 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा यावेळी प्रा. शिंदे आणि श्री. केसरकर यांनी घेतला.


 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111