पंढरीतील संतोष अधटराव यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
पंढरपूर Live 26 October 2017

पंढरपूर येथील पुंडलिक मंदिर समितीचे सदस्य व आदिम विकास परिषदेचे नागेश अधटराव यांचे बंधु संतोष चंद्रकांत अधटराव (वय 43), रा. हनुमान मैदान, कोळी गल्ली, पंढरपूर यांची मोहोळ तालुक्यातील शेजबाभुळगावच्या शिवारात अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने निर्घृण  हत्या केल्याची घटना घडली आहे.

काल दि. 25 आॅक्टोबर रोजी दुपारी घराबाहेर पडलेले संतोष अधटराव हे रात्री सुध्दा घरी न आल्याने त्यांच्या कुटूंबियांनी पंढरपूर शहर पोलिसांना याबाबत कळलिले होते. पंढरपूर शहर पोलिस याबाबत तपास करत असतानाच मोहोळ तालुक्यातील शेजबाभुळगावच्या शिवारात एकाचा धारदार शस्राने वार करून खुन झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मृतदेहाची शहानिशा केली असता हा मृतदेह संतोष अधटराव यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून हा खुन केल्याचे स्पष्ट झालेय. हा खुन कोणी व का केला याचा तपास पोलीस घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे.
संतोष अधटराव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, व एक बंधु असा परिवार आहे.

  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे