ऊसदराबाबत कोल्हापूर पॅटर्नचा अवलंब करावा  - सहकार मंत्री

पंढरपूर Live 13 NOVEMBER 2017
     पुणे, दि. १२ : सोलापूर जिल्हयातील शेतक-यांना एफआरपी प्रमाणे ऊसाचा भाव मिळेल. ऊसाची पहिली उचल घेण्यासाठी दराबाबतचा कोल्हापूर पॅटर्नचा अवलंब करावा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
    सोलापुरातील सहकारी साखर कारखान्यांनी शेतकर्यांना द्यायच्या ऊसदराबाबत तोडगा काढण्यासाठी आज पुणे येथे व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस येथे बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सर्व संबंधितांना वरील आवाहन केले.
    या बैठकीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार बबन शिंदे, माजी मंत्री सिद्राम म्हेत्रे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जनहित शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    श्री. देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना प्रतिटनास एफआऱपी प्रमाणे योग्य भाव देण्यात येईल. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तसेच सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्नचा  अवलंब करुन शेतक-यांना योग्य दर द्यावा. इतर काही अडचणी असल्यास शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी व साखर कारखादारांनी एकत्रित येऊन त्या सोडवाव्यात जेनेकरुन कोणाचेही नुकसान होणार नाही.
   श्री. खोत म्हणाले, मागील वर्षी दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे सोलापूर जिल्हयात ऊसाला चांगला दर मिळाला होता मात्र यंदाच्या वर्षी परिस्थिती चांगली असल्यामुळे दरात चढउतार होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी संघटनांनी व साखर कारखानदारांनी एकत्रित येऊन यावर तोडगा काढावा.
   बैठकीत वजन काट्याचा प्रश्न, साखर उतार्याचा प्रश्न, जिल्ह्यात ऊसासाठी एकच भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावा  त्याचबरोबर साखर विक्रीत आधिक पारदर्शकता येण्यासाठी सेंट्रलाईज्ड आँनलाईन सिस्टम राबवणे आदी मुद्यावरही चर्चा झाली.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे