पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन’ स्वेरी कॅम्पसमध्ये विचार मंथनाने व वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. प्रारंभी प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिना’चे महत्व पटवून सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पदवी अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सचिन सोनावणे म्हणाले की, ‘निसर्गाची होत असलेली सध्याची हानी पाहून भविष्यकाळात पक्षी व वृक्ष वाचतील का ? अशी शंका निर्माण होत आहे.
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
यासाठी समाजात वृक्ष वाचविण्यासाठी व असलेली झाडे तोडू नयेत यासाठी जागरूकता निर्माण करणे गरजेचे झाले आहे. यासाठी केवळ झाडे लावून उपयोगी नाहीत तर ते सुरक्षितपणे वाढण्यासाठी त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.’ असे सांगून पर्यावरणावर विचार मंथन केले. वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पांडुरंगामुळे पंढरपुरात तुळशीला विशेष महत्व आहे. तसेच निसर्गातील इतर वृक्षांपेक्षा तुळशीमधून अधिक प्रमाणात ऑक्सिजन वायू मिळतो. या कारणाने ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिना’चे औचीत्य साधून स्वेरीच्या परिसरात जवळपास एकशे पंचवीस तुळशीची रोपे लावण्यात आले.
हा स्तुत्य उपक्रम डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी केला असून यासाठी डिप्लोमा सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. श्रुष्टी बागल, उपविभागप्रमुख प्रा. अक्षय साळुंखे, सेसा (सिव्हील इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोशिएशन) चे समन्वय प्रा. हरी ऐवळे, वर्गशिक्षक प्रा. नितीन शिंदे, प्रा.अभिजित पाटील, उपाध्यक्ष मयूर शेंडे, सचिवा ऋतुजा हेंबाडे, सहसचिवा स्मिता पंडीत यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सेसाचे विद्यार्थी अध्यक्ष प्रतिक शेटे यांनी केले तर तेजस मोरे यांनी आभार मानले.

0 Comments