परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी येथील औष्णिक विज निमिर्ती केंद्रासाठी आपल्या पुर्वजांच्या जमिनी देणार्या भुमिपुत्रांना न्याय मागण्यांसाठी पाच पाच दिवस उपोषणास बसावे लागत आहे. हे उपोषण लोकशाही मार्गाने असले तरी राज्यसरकारने प्रकल्पग्रस्तांच्या या संयमाचा अंत पाहु नये असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केला आहे. औ.वि.केंेद्राच्या कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांनी सुरु केलेल्या उपोषणास भेट देऊन सक्रीय पाठिंबा नोंदविला.
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
आपल्या न्याय मागण्यांसाठी दि.30 जुलै पासुन औ.वि.केंद्राच्या कार्यालयासमोर 36 प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. पाच दिवसानंतरही सरकारने उपोषणार्थींची मागणी मान्य केलेली नसल्याने अनेक उपोषणार्थींची तब्यत बिघडली आहे. ज्यांच्यामुळे परळीचे औ.वि.केंद्र उभारले अशा भुमिपुत्रांनाच उपोषण करण्याची वेळ या दळभद्री सरकारने आणली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर लोकशाही मार्गाने होणारे हे उपोषण भगतसिंगाच्या मार्गाने होईल असा इशाराही डॉ.संतोष मुंडे यांनी दिला. यावेळी त्यांनी प्रकृती खालवलेल्या उपोषणार्थींच्या चौकशी केली. पाठिंबा दिल्याबद्दल उपोषणार्थींच्या वतीने ह.भ.प.रामेश्वर कोकाटे, शशिकांत केंद्रे, अमोल बिडगर, नामदेव मुंडे, गोविंद मुंडे आदींनी आभार मानले.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments