पंढरपूर Live- दि.08: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे,आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे सर्वच राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना मुख्य निवडणूक निरिक्षक विरेंद्र सिंग बंकावत यांनी दिल्या.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना व उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती.
या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.वैशाली वाघमारे, स्वप्निल रावडे, न.पाचे मुख्याधिकारी अनिकेत महानोरकर यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवार उपस्थित होते.
मुख्य निवडणूक निरिक्षक बंकावत यावेळी बोलताना म्हणाले, आदर्श आचार संहितेच्या पालन सर्वांनी करावे. उमेदवारांनी आवश्यक परवानगी घेवून सभांची जागा व वेळ या बाबत स्थानिक पोलीस प्रशासनाला आगोदर सूचना द्यावी. सभेच्या ठिकाणी निर्बंध किंवा प्रतिबंध आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पुर्णपणे पालन करावे. राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी पदयात्रा काढताना वाहतूकीला कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता घेवून वाहतूकीचे नियम पाळावेत.तसेच कोणत्याही पक्षांच्या कार्यकर्ते अथवा उमेदवारांनी मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रावर आणू नये अशा सूचना ही मुख्य निवडणूक निरिक्षक बंकावत यांनी यावेळी दिल्या.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
उमेदवारांनी प्रचाराच्या वाहनांची परवानगी दर्शनी भागावर लावावी, मतदानाच्या दिवशी मतदान स्लिपवर चिन्ह अथवा छायाचित्राचा वापर करु नये. उमेदवारांच्या बुथ प्रतिनिधींनी मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी चा वापर करु नये. आदर्श आचार सहिंतेचे काटेकोरपणे पालन करुन कायदा व सुववस्था अबाधित राखावी अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीत मतदान करण्याची पध्दती, मतदान केंद्र
याबाबत काही शंका उपस्थित केल्या या शकांचे निरसनही मुख्य निवडणूक निरिक्षक बंकावत यांनी यावेळी केले. बैठकीत उमेदवारांना व उमेदवारांच्या प्रतिनिधींना सर्व निवडणूक विषयी माहिती पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments