मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – भारतीय जनता पक्ष- शिवसेना, रिपब्लिकन, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती यांच्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत व्यक्त केला. भाजप - शिवसेनेतर्फे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीला मोठे यश मिळाले. भाजप शिवसेना युती ही हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित आहे.महायुतीतील सर्व घटक पक्ष व्यापक वैचारिक भूमिकेतून एकत्र आले आहेत.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
विधानसभा निवडणुकीचे जागावाटप करताना आम्ही सर्व घटक पक्षांनी तडजोड केली आहे. भाजप १५०, शिवसेना १२४ तर अन्य घटक पक्ष १४ जागा लढविणार आहेत. जागावाटपावरून काही ठिकाणी नाराजी असली तरी दोन दिवसांत सर्व बंडखोरांची समजूत काढण्यात यश मिळेल. आमच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्याच्या विकासाला गती दिली. पुन्हा सत्तेवर आल्यावर आम्हाला राज्यातील दुष्काळी भागाला पाणी पुरवठा करून सुजलाम सुफलाम करायचे आहे. आमच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीला अभूतपूर्व यश मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments