याबाबतची माहिती अशी, मंगळवारी (दि. 10) रात्री अकराच्या सुमारास पीडित महिला घरगुती कारणास्तव आळंदी येथून घराबाहेर पडली. पेरणेफाटा येथे जायचे असल्याने ती वाहनाची वाट पाहत मरकळफाटा येथे थांबली होती. यादरम्यान येथे टेम्पो आला असता तिने टेम्पोला हात दाखवून थांबवले.
रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत टेम्पो चालक आणि क्लीनर यांनी महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटी केली. तसेच तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला पहाटे चारच्या सुमारास पिंपरी-चिंचवड परिसरात पुणे-बंगळुरू महामार्गावर सोडून दिले.
महिलेने आजुबाजूच्या लोकांच्या मदतीने पोलीस चौकी गाठली. गुन्हा आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तो त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

