कौटुंबिक वादातून या चिमुकलीला झुडपात टाकून तिच्या आईने पळ काढल्याची प्राथमिक माहिती समजते. परंतु काही तासांमध्येच पोलिसांनी तिच्या काकांचा शोध घेतला असून चार महिन्यांच्या बाळाला रस्त्यात सोडल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी बाळाच्या आईला अटक करण्यात आली आहे.
कोथरूडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी याबाबत तपास यंत्रणा गतिमान करत शोध घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. या तपासादरम्यान त्या बाळाच्या काकांचा शोध लागला आणि त्यांची विचारपूस करून बाळाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
कोथरूड-चांदणी चौकातून कोथरूडकडे येणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या झुडपात 4 महिन्याच्या बाळाला कोणीतरी टाकून गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली होती.
या बाळाला कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देऊन बाळाच्या आई वडिलांचा शोध सुरू झाला. याबाबत सर्वत्र सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आणि बाळाचे फोटो देखील व्हायरल झाले.
पुढे बाळाच्या काकांच्या मदतीने वडिलांचा शोध घेतला. महिला वारंवार चिडून घर सोडून जात असल्याची माहिती तिच्या पतीने दिली आहे. याप्रकरणी आईला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांच्या संवेदनशील आणि कार्यतत्परतेमुळे ते बाळ सुखरूप तिच्या कुटुंबाकडे पोहचले आहे.



0 Comments