पंढरपूर: प्रतिनिधी
एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयात दि. ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून नाशिक इंडस्ट्रीयलचे संचालक महेश दाबक यांचे "नवीन शैक्षणिक धोरण" या विषयावर ऑनलाईन वेबिनारच संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   ५ सप्टेंबर हा दिवस डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून सर्वञ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी सर्वञ कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संचार बंदी घालण्यात आली आहे. शाळा व काॅलेज यांना सुट्टी असल्याने ५ सप्टेंबर ह्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी उद्योजक महेश दाबक यांचे ५ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ वाजता "नवीन शैक्षणिक धोरण" या विषयावर ऑनलाईन वेबिनार घेण्यात आला.

   या वेबिनारच्या सुरूवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन उद्योजक महेश दाबक यांचे स्वागत केले. ऑनलाईन वेबिनार मध्ये महेश दाबक यांनी सद्या देशाला गुणवत्ता शिक्षणाची गरज आहे. शैक्षणिक विकासाशिवाय आर्थिक प्रगती अशक्य आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे संपुर्ण राष्ट्राचा विचार मांडले गेले. शैक्षणिक धोरणाचे विविध भाग, शालेय शिक्षण घेत असताना मानसिकता घडली पाहिजे, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याची इच्छा दाखवली तर शासनाकडून शिक्षण शिक्षण दिले जाते, उच्च शिक्षणातील महत्वाचे टप्पे, ऑनलाईन शिक्षण प्रणाली आदी विषयांवर महेश दाबक यांनी माहिती दिली.
ह्या ऑनलाईन वेबिनार मध्ये १०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी सहभाग नोंदविला असुन सहभागी प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना महेश दाबक यांनी उत्तरे दिली.
  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुञसंचालन व आभार प्रदर्शन डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले.


फोटो "- पंढरपूर सिंहगड मध्ये शिक्षक दिनानिमित्त वेबिनार मध्ये बोलताना महेश दाबक

पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977