पंढरपूर (दि.07):- ‘रक्तदान हेच जीवदान, रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान’ आहे. नागरिकांमध्ये तसेच तरुणांमध्ये रक्तदानाचे महत्व रुजविण्यासाठी आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 9 जुलै 2021 रोजी सकाळी 9.00 वाजले पासून रायगड भवन, तहसिल कार्यालय, येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.

    .......................

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    "पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ......................

तहसिल व दुय्यम निंबधक कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी , तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार , महा ई सेवा केंद्र चालक, सर्व स्टॅप व्हेंडर यांच्या सयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबीराचे आयोजन  केले आहे. कोरोना संसर्गाच्या कालावधीत रक्तपेढींना मोठ्या प्रमाणत रक्ताचा तुटवडा भासत होता. रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. यासाठी  जास्ती जास्त. रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे, आवाहन तहसिलदार बेल्हेकर यांनी केले.