जयसिंगपूर: दारूच्या पैशासाठी हसन अमरशरीफ जमादार (वय 20, रा. गल्ली नं. 13, रणवीर चौक, जयसिंगपूर) याने बेबी आण्णाप्पा गाडीवडर (वय 62, रा.
नांदणी रोड, जयसिंगपूर) या मनोरुग्ण महिलेवर सोमवारी डोक्यात दगड घालून खुनी हल्ला केला होता. दरम्यान, या गंभीर जखमी महिलेवर सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
बेबी गाडीवडर गेल्या सहा महिन्यांपासून मालू हायस्कूल समोरील फुटपाथवर झोपत होत्या. शिवाय हमालीचे कामही करीत होत्या. सोमवारी गाडीवडर यांच्या डोक्यात दगडाने मारून खून करण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले होते. त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली होती. यात कोणतेही सीसीटीव्ही फुटेज आढळले नव्हते. त्यामुळे 50 हून अधिक लोकांकडे चौकशी केली असता हसन जमादार याचा या मनोरुग्ण महिलेच्या पैशावर डोळा होता. ती झोपल्यानंतर तिच्याकडील पैसे काढून घेताना तिने आरडाओरड केल्याने डोक्यात पेव्हिंग ब्लॉक व दगड घालून जखमी केल्याची कबुली संशयित जमादार याने दिल्याची माहिती सपोनि रणजित पाटील यांनी दिली होती.
येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर उभे केले असता गुरुवारी त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. अशातच शुक्रवारी सकाळी गाडीवडर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला




0 Comments