श्री !...................................आधी गणाला रणी आणला !..नाहीतर रंग पुन्हा सुना सुना
!................
..............गणेशोत्सवाच्या दहा दिवसात ऑर्केस्ट्रा , नाटके आणि सिनेमे यांची रेलचेल असायची . मेळ्यांचा काळ मी बघितला नाही पण लहानपणी पंढरपुरात गणेशोत्सव काळात रंगणाऱ्या मेळ्याची चर्चा घरी दारी सुरु असायची . मेळे म्हणजे गायन , वादन , नाच , नाटके , नकला अश्या सर्व कलाप्रकारांचे एकत्रित सादरीकरन असायचे .बाबुराव अन्नदाते , राजाभाऊ मंगळवेढेकर , अंबिके पेंटर ,अर्जुन पेंटर, वसंतराव बडवे , शंकर वनारे अश्या मंडळींनी हे मेळे बसवून पंढरपूरच्या गणेशोत्सवात धमाल उडवून दिली . नामान्कीतान्बरोबरच नवोदितांनाही या मेळ्यान मधून आपापले कला प्रकार सादर करायला मिळायचे . मराठी चित्रपट सृष्टीतील कितीतरी नामांकीतांनी पंढरपूरच्या या मेळ्यातून हजेरी लावल्याच्या आठवणी जुने जाणकार सांगतात . गणेशोत्सवाचे १० दिवस ह्या मेळ्यासाठी चौका चौकात प्रेक्षकांची झुंबड उडायची असे सांगतात . एकेका दिवसात ३ ते ४ प्रयोग केल्याच्या आठवणीही जाणकार सांगतात . " गणेश उत्सव आला आला , गंमत वाटे मला " अशी गाणी त्यावेळी मेळ्यानमधून गाजल्याचे जाणकार सांगतात . दिलीप टोमके , विजया बडवे असे बाल कलाकार या मेळयातूनच चमकले . दिलीप टोमके हे तर पुढे रेडीओ स्टार म्हणून नामांकित झाले . १९५६ च्या महापूर नंतर हे मेळे बंद पडल्याचे सांगतात ..................................पंढरपूरच्या नाट्यवेड्या कलाकारांनी बसवलेली नाटके हाही पंढरपूरच्या आकर्षणाचा भाग असायचा . डॉक्टर मोहोळकर , शाहीर सावंत , भगवान कदम , सोनाबा सासवडे , विनय बडवे , वसंत उत्पात , मधुकर (दादा ) टोमके अशी काही मंडळी जोमाने नाटके बसवायची आणि गणेशोत्सवात त्यांचे धूम धडाक्यात प्रयोग व्हायचे . नट सम्राट , चांदणे शिंपित जा , गुड बाय डॉक्टर , कवडी चुंबक , प्रेमा तुझा रंग कसा ? , घरात फुलला पारिजात , तीन चोक तेरा , दिवा जाळू दे सारी रात , तरुण तुर्क अशी कौटुंबिक नाटके गणेशोत्सवात सादर व्हायची. (माझ्या सौभाग्यवतीने यातल्या कित्येक नाटकातून भूमिका केल्या आहेत .) त्याच बरोब्बर जालिंदर वाडेगावकर , मधुकर टोमके , मोहन काळे , शिवाजी सागर , ज्ञानोबा शिंदे यांची ग्रामीण ढंगाची अस्सल गावरान नाटकेही गर्दी खेचायची . दसरा उजाडला ,फकिरा , जय मल्हार , टिळा लावते मी रक्ताचा अशी ग्रामीण ढंगाची नाटके बघण्यासाठी पंढरपूरकर वेडे व्हायचे . विजयेंद्र जोशी , मुरलेन्द्र शेटे,निर्मला भिंगे प्रभा काळे , छाया काळे , मोहन नेर्लेकर , बी गोरे , सुभाष भिंगे , प्रकाश महाजन बडवे अश्या मंडळी चाही पंढरीच्या नाट्य चळवळीत मोलाचा वाटा आहे (आणखी बरीच नावे राहून गेली आहेत त्याबद्दल क्षमस्व .).................................................................पंढरपूरच्या मंडळींची नाट्य चळवळ थंडावल्या नंतर कोल्हापूर , सांगली अश्या भागातल्या मंडळींची कलापथके , ओर्केष्ट्रा पंढरपुरात यायला लागले . आम्हा महाविद्यालयीन तरुणांसाठी हे आकर्षण असायचे . रात्री जेवण वगैरे उरकून हि कला पथके बघायला आम्ही मित्र मित्र जायचो . .....................................................गल्ली बोळातून किंवा चौका चौकातून फुकट दाखविले जाणारे चित्रपट हाही पंढरपूरच्या गणेशोत्सवातला आकर्षणाचा भाग असायचा . चौकात किंवा गल्लीत पडदा लाऊन प्रोजेक्टर वर चित्रपट दाखवले जायचे . मुख्यता मराठी कौटुंबिक चित्रपटच दाखवले जायचे कारण त्या त्या भागातला स्त्री वर्ग मोठ्या प्रमाणावर चित्रपट बघण्यासाठी गोळा झालेला असायचा . साधी माणसं , मोहित्यांची मंजुळा , चोरीचा मामला , सोंगाड्या असे कितीतरी गाजलेले चित्रपट गणेशोत्सवाच्या काळात असे फुकट पडद्यावर बघायला मिळायचे . तेंव्हा टि. व्ही वगैरे नसल्याने ह्याचे खूपच अप्रूप वाटायचे . लोक घरून चटया वगैरे घेऊन यायचे आणि जागा धरून सिनेमा कधी सुरु होतोय याची वाट बघायचे . ........................................गणेशोत्सवाचे हे १० दिवस कलाकार आणि त्यांच्या कला यांना झळाळी आणून देणारे असायचे . रम्य ते दिवस , रम्य त्या आठवणी आणि रम्य तो गणेशोत्सव. ...............................................श्याम सावजी .......पंढरपूर
0 Comments