पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचकांना व जाहिरातदार बंधु-भगिणींना गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 19 मार्च 2018
नगरसेवक संदीप पवार यांचे धाकटे बंधु भैया पवार यांच्याशी मागील वर्षी किरकोळ हाणामारी व भांडणाचा राग मनात धरुन नगरसेवक संदीप पवार यांची हत्या केल्याची तक्रार संदीप पवार यांच्या मातोश्री माजी नगराध्यक्षा श्रीमती सुरेखा दिलीप पवार यांनी पंढरपूर पोलिस ठाण्यात दिली आहे.
श्रीमती सुरेखा पवार यांच्या तक्रारीनुसार यातील आरोपी अक्षय उर्फ बबलु सुरवसे याने मागील वेळेस प्रदीप उर्फ भैया पवार यांचेबरोबर नगरपालिकेचे पाठींागे, पंढरपूर या ठिकाणी गेल्या वर्षी चौकामध्ये उभे राहणेवरुन व एकमेकांकडे रागाने बघणेचे कारनावरुन किरकोळ हाताने माराराी झाल्याचा राग मनात धरुन त्यानुसार पोलिसांनी संशयीत आरोपी अक्षय उर्फ बबलू सुरवसे रा. पंढरपूर, विकी उर्फ विकास मोरे, संदीप अधटराव व इतर 6 ते 7 अज्ञात इसमांना मदतीस घेवून दि.18 मार्च 2018 रोजी दुपारी 1 वा. 10 मि. वाजण्याच्या सुमारास नगरसेवक संदीप पवार हे हॉटेल श्रीराम, स्टेशन रोड, पंढरपूर येथे आपल्या मित्रांसोबत चहा पिण्यास बसले असताना त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर ठिकठिकाणी पिस्तुलाचा वापर करुन गोळीबार केला. कोयत्याने मारहाण करुन त्यांचा खुन केला. त्यानुसार पोलिसांनी संशयीत आरोपी अक्षय उर्फ बबलू सुरवसे रा. पंढरपूर, विकी उर्फ विकास मोरे, संदीप अधटराव व इतर 6 ते 7 अज्ञात इसमांवर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम 302, 143, 147, 148, 149 आर्म अॅक्ट क्र. 3, 5, 25 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे हे करत आहेत
या हत्याकांडामुळे काल दिवसभर पंढरपूर शहर कडकडीत बंद होते. आज दि. 19 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कांही दुकाने उघडली गेली.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments