https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjOy4jQlappg89K6LQscslrl_s8ZaEYV7eJrCMjDsFXUZ32Fl0nayly_tJ5dafGY9RH9bh7b8gNc8n7q26I1zi-iUBeazrgWbGejqfxnn-atm3lAUQ3sUqmALLr9mXp-k-Ufrwk2m484rji/s1600/Mona+Singh+hot+Photos+07.jpg                  'जस्सी जैसी कोई नही'मधून मोना सिंग छोट्या पडद्यावर चमकली. त्यानंतर 'थ्री इडियट्स'मध्ये करीनाच्या बहिणीच्या भूमिकेतून तिनं बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं. गेली काही वर्ष थिएटर करत असल्यानं ती मोठ्या पडद्यावर दिसत नव्हती. लवकरच 'झेड प्लस' या आगामी सिनेमात ती चमकणार आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमातली तिची भूमिका म्हणजे नुसती शोभेची बाहुली नसेल. महत्त्वाची भूमिका देणार असाल तरच सिनेमा करेन अशी अटच तिने घातली होती म्हणे. राजकीय पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट म्हणजे कॉमेडीपट असेल.