वातावरण बिघडले.... आजारपण वाढले... काळजी घ्या...

http://drugline.org/img/term/viral-infection-16000_0.jpg             ऑक्टोबरच्या उत्तरार्धातही सुरू असलेली रिपरिप, मध्येच उन्हाचा तडाखा आणि झोंबणारी थंडी अशा वातावरणातील बदलांमुळे शहरवासीयांचे आरोग्य बिघडले आहे. सर्दी, खोकल्याबरोबर थंडीसह येणारा ताप अशा लक्षणांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वातावरणातील बदलाच्या पेशंटची गर्दी सरकारी आणि खासगी रुग्णालयांतही वाढली आहे.


                 महिन्याच्या सुरुवातीला ऑक्टोबर हिट जाणवू लागली होती. मात्र दिवाळीत पावसाला सुरुवात झाली. निलोफर वादळाच्या फटक्याने शनिवारपासून झोंबणारे वारे व मुसळधार पावसाने शहर परिसरासह सोलापूर जिल्ह्याला झोडपून काढले. पावसाने तापमानातही घट झाली. त्यातून थंडीही वाढली. मध्यंतरी तीन दिवस पाऊस आणि नंतर कडक ऊन पडले. ऑक्टोबर हिटमुळे डोळ्यांच्या विकारांचा फटका बसला आहे.
             जंतूंचे प्रमाण वाढल्याने तापाचे रुग्ण वाढले आहेत. डेंगीनेही डोके वर काढले आहे. वेळेवर औषधे घेण्याबरोबर घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवून साथीचे रोग होऊ नयेत याची काळजी घेण्याची गरज आहविचित्र हवामानाशी शरीर लगेच जळवून घेत नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच सध्या पंढरपूर शहर व परिसरात तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत असून, छाती भरून येणे, खोकला, थंडी वाजून ताप येणे या लक्षणाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तापाची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.

Post a Comment

0 Comments