आर.टी.ई. अ‍ॅक्टअंतर्गत मुलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी निधी द्या -प्रा.सुभाष माने; नाशिक येथील अधिवेशनात मागणी

               पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):-

                                    शाळेतील आर.टी.ई. अ‍ॅक्ट अंतर्गत 10 भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी शासनाने शाळांना राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान या योजनेखाली आर्थिक निधी उपलब्ध करूद द्यावा, अशी मागणी मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष प्रा.सुभाष माने यांनी केली.

                

                 नाशिक येथे महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे 54 वे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. त्यावेळी समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष अरुण थोरात, सोलापूर मुख्याध्यापक संघाचे सचिव रंगसिध्द दसाडे, सहसचिव महेश सरवदे, तानाजी माने, रेवणसिध्द रोडगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
            
                  पुढे बोलताना प्रा.सुभाष माने म्हणाले, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या अंतर्गत राज्यातील केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांना लाभ मिळत असताना राज्यामधील खाजगी माध्यमिक शाळा मात्र या लाभांपासून वंचित राहत आहेत. राज्य शासनाने हा निधी मिळविण्यासाठी पुढाकार घेवून खाजगी अनुदानिक शाळांना निधी मिळवून दिल्यास आर.टी.ई. अ‍ॅक्टमधील 10 मानके व इतर शैक्षणिक गरजा शाळांना पूर्ण करता येणार आहेत. शासनाने प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी शिक्षकेत्तर पदाची तरतुद करावी व पदे मंजूर करावीत. तसेच मुल्यांकनपात्र शाळांना ताबडतोब वेतन अनुदानाची तरतुद करावी. मुल्यांकनपात्र उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांची यादी ताबडतोब जाहिर करावी. तसेच या शिक्षकांचे मान्यता कॅप त्वरीत लावून मान्यता द्याव्यात. वैद्यकीय प्रतिपुर्ती कॅशलेस करावी. आय.सी.टी. योजनेचा ज्या शाळांना अद्याप लाभ मिळाला नाही त्या शाळांना आय.सी.टी. लॅब त्वरीत मंजूर करावी. सन 2014-15 चा सेवकसंच मंजूर करून वाढीव पदे व तुकड्या ताबडतोब मंजूर कराव्यात, अशा विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

                  राज्य मुख्याध्यापक संघ व महामंडळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडविण्यास कटिबध्द असून हे सर्व ठराव शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचेही प्रा. माने यांनी स्पष्ट केले.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी  

    प्रतिनिधी नेमणे आहेत...  

    • या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...

      आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात...

    • तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...

      आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी

      संपर्क साधावा...

-संपादक-  भगवान गणपतराव वानखेडे

सा.झंझावात,   पंढरपूर लाईव्ह

मोबा. 8055434499  8308838111   8552823399

कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह

livepandharpur@gmail.com   jhanjavat@gmail.com

 या मेल आय डी वर ई-मेल करावेत.

ताज्या घडामोडी साठी बघत रहा....

  www.pandharpurlive.com

 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments