केंद्रीय राज्यमंत्र्यानी घेतले विठ्ठलाचे दर्शन
पंढरपूर दि.30- केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी विठ्ठल- रुक्मिणी मंदीराला भेट देवून विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. दर्शना नंतर श्री. दानवे-पाटील यांचा विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने अध्यक्ष आण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते उभयंतांचा शाल, श्रीफळ व विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पालकमंत्री विजयसिंह देशमुख, सांगलीचे खासदार संजय (काका) पाटील, आ. सुभाष देशमुख, शहाजी पवार, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, तहसिलदार गजानन गुरव, मंदीर समिती सदस्य प्रा.जयंत भंडारे, बादलसिंह ठाकूर यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
छाया- उमेश टोमके
00000

0 Comments