पंढरपूर लाईव्ह:-
काल दि. 30-1-2015 रोजी शहीद जवान एम. एन. राय यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.. यावेऴी त्यांच्या अकरा वर्षाच्या मुलीने आपल्या पित्याला अंतीम निरोप देताना सँल्युट ठोकत आपल्या अनावर झालेल्या भावना व्यक्त करताना जे शब्द आपल्या ओठातून काढले त्यामुळे उपस्थित सगळेच सद्गगदीत झाले...
शहीद एम. एन. राय या शुर सैनिकाच्या मुलीने (अलका राय हिने) आपल्या दिवंगत पित्याला सँल्यूट ठोकत.. आपल्या पित्यास साश्रूनयनांनी निरोप देत शब्द उच्चारले.. "होगा के नही होगा... होके रहेगा।" यावेळी उपस्थित सेनाधिका-यांनी तिचे सांत्वन केले.
यावेळी शहीद राय यांची पत्नी, आई, वडील, भाऊ आदीबरोबरच लहानगा मुलगाही उपस्थित होता.
शहीद राय यांचा शेवटचा व्हाँटस अप संदेश होता... "जिंदगी मे बडी शिद्दत से निभाओ अपना किरदार, की परदा गिरने के बाद भी तालियाँ बजती रहे।"

0 Comments