पंढरपूर लाईव्ह
--------
दि. 16 फेब्रुवारी 2015
मुंबई (लीलावती हॉस्पिटल)
दि. 16 फेब्रुवारी 2015
राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अमिट ठसा उमटवलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी अखेर आज या जगाचा निरोप घेतला. गेल्या अनेक दिवसापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र आज ही झुंज संपली. उद्या दि. 17 फेब्रुवारी रोजी सांगली जिल्ह्यातील तासगांव येथे दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.
अत्यंत साध्या आणि राजकारणातील संयमी चेहरा असलेल्या आर. आर. ‘आबा’ यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरुन येणारी फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आबांचे वय 58 वर्षे होते. हे वय जगाचा निरोप घेण्याचे निश्चितच नव्हते. मात्र नियतीच्या मनात कांही वेगळंच होतं. असं ही म्हटलं जात आहे की आबांनी उपचार लवकर घेतले असते तर कदाचित आज ते आपल्यात असते. मात्र होणारी घटना घडून गेलेली आहे. जि.प. सदस्य ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदापर्यंत मजल मारलेले आर. आर. आबांना हा महाराष्ट्र कधीच विसरु शकणार नाही. आमच्या पंढरपूर लाईव्ह टीम तर्फे आबांना भावपुर्ण श्रध्दांजली.


0 Comments