राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय प्रतिनिधी संमेलन
------------------------------------पंढरपूर लाईव्ह दि.5:-
(पुणे) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आतापासून तयारीला सुरुवात केली आहे . त्याचा एक भाग म्हणून येत्या 7 आणि 8 फेब्रुवारीला पक्षाचे राज्यस्तरीय प्रतिनिधी संमेलन होणार आहे .
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राष्ट्रावादी पक्षाचे उद्दिष्ट ,धोरणे , आणि भविष्यातील वाटचाल सभासद नोंदणी ,पक्ष सघटन आणि निवडणुका, प्रसार माध्यम ,सोशल मिडिया , व पक्षाची भूमिका पक्षाचे आगामी उपक्रम , विरोधी पक्ष आंदोलन आणि संघर्ष या विषयावर चर्चा होणार आहे संमेलनाचे उदघाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते होणार आहे . त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत .
संमेलनात पक्षाचे आजी -माजी आमदार ,खासदार, माजी मंत्री, पदाधिकारी सहभागी होणार आहेत . हे संमेलन बालेवाडी येंथे होणार आहे .

0 Comments