14 माघ, 1936 (दुपा. 3.30 वा.)
दि. 3 फेब्रुवारी 2015
Pandharpur Live
बँकींग, आर्थिक सेवा आणि विमा हे मूल्य आणि संपत्ती निर्माण करण्याचे महत्वाचे साधन-मुख्यमंत्री
मुंबई, दि. 3 : बँकींग, आर्थिक सेवा आणि विमा अशा आर्थिक सेवांची एक परिक्षेत्र प्रदान करणारी (बीएफएसआय) ही एक महत्वाची उद्योग संज्ञा आहे व त्याचे राज्याच्या विकासात महत्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे इलेट (elet)द्वारा आयोजित ‘लीडरशीप समीट-2015’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, अतिरिक्त मुख्य सचिव के.पी.बक्षी, युआडीएआयचे उपमहासंचालक अजय पांडे, एलआयसी ऑफ इंडियाचे चेअरमन एस.के.रॉय आदि मान्यवर उपस्थित होते.
बँकींग, आर्थिक सेवा आणि विमा अशा आर्थिक सेवा हे मूल्य आणि संपत्ती निर्माण करण्याचे महत्वाचे साधन आहेत. देशाचा व राज्याचा आर्थिक विकास साधायचा असेल तर सर्वप्रथम दारिद्रयता दूर करुन सामान्य नागरिकांमध्ये नैतिक मुल्यांची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी एकात्मिक पद्धतीने उपक्रम, धोरण योग्यरित्या राबविल्यास निश्चितच विकास साधता येईल, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्याचा एकात्मिक आर्थिक विकास साधणे हे या परिषदेसमोर महत्वाचे आव्हान असून या आव्हांनावर मात करण्यासाठी निश्चितच उपाययोजन करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
0 0 0 0

0 Comments