एका सेल्फीचा अपघात
Pandharpur Live
05/02/2015
न्यूयॉर्क
सेल्फी म्हणजे मोबाईलने स्वत:च स्वत:चे छायाचित्र काढणे. पण हे काही वेळा महागात पडू शकते याची कुणाला कल्पनाही नसेल. अमेरिकेत गेल्या वर्षी झालेल्या विमान अपघातात भारतीय वंशाचा वैमानिक व सहप्रवासी असलेला जालंधरचा सिंथेसायजर वादक असे दोघे सेल्फी काढण्याच्या हव्यासामुळेच अपघात होऊन मरण पावले होते. त्या रात्री ढगाळ हवामान होते व कोलोरॅडोत व्ॉटकिन्स सिटी येथे हा अपघात झाला होता.
वैमानिक त्याचे व सहप्रवाशाचे सेल्फी काढण्याचा प्रयत्न करीत होता, असे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने चौकशीत म्हटले आहे.
विमान चालवताना सेलफोन वापरण्याचा मोह न आवरल्याने हा अपघात झाला असे दिसून आले आहे. या वैमानिकाचे नाव अमृतपाल सिंग (वय २९) व सहप्रवाशाचे नाव जतिंदर सिंग (वय ३१) होते. विमानात काहीही दोष नव्हता असे चौकशीत दिसून आले, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीत म्हटले आहे. अमृतपालसिंग याने गो प्रो कॅमेऱ्याच्या मदतीने सेसना १५० या छोटय़ा विमानात प्रवाशांसह सेल्फी काढण्याचा काहीवेळा प्रयत्न केला होता.

0 Comments