रेल्वे हद्दीतील झोपड्या वाचविण्यासाठी खा.बनसोडे यांचे मार्फत प्रयत्न
पंढरपूर लाईव्ह:-
पंढरपूर 17 : पंढरपूर शहरातील सरगम थिएटर ते रेल्वे पुलापयरतच्या रेल्वेच्या हद्दीत येणार्या सर्वसामान्य
नागरिकांच्या झोपड्या हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने संबंधितांना नोटीसा बजाविल्या असून या झोपड्या हटविल्या तर शेकडो गोरगरीब लोकांचे संसार रस्त्यावर येणार आहेत. त्या झोपड्या हटवू नयेत यासाठी सोलापूर विभागाचे खासदार शरदजी बनसोडे यांचे मार्फत युवा नेते प्रशांतराव परिचारक प्रयत्न करीत असून लवकरच पंढरपूर नगरसेवकांचे शिष्ठमंडळ खा.बनसोडे यांचे मार्फत डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर यांची भेट घेणार आहेत. तसेच या नागरिकांची अन्य सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करणेबाबतही प्रयत्न चालू आहेत अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी दिली.
पंढरपूरातील रेल्वेच्या हद्दीत असणार्या दोनशेच्यावर गोरगरीब कुटुंबावर विस्थापीत होण्याची पाळी आली असून येथील झोपड्या हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्यांना नोटीसा बजाविल्या आहेत. मात्र या झोपड्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीस कसलाही अडथळा निर्माण होत नाही. तरी या लोकांना बेघर करू नये यासाठी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती झोपडपट्टी वासियांचे वतीने प्रशांतराव परिचारक यांनी खा.बनसोडे यांना केली असून त्यांनी याबाबत स्वत: लक्ष घालून रेल्वेच्या अधिकार्यांशी बोलणार असल्याचे आश्वासन प्रशांतराव परिचारक यांना दिले आहे. याबाबत माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचे नेतृत्वाखाली नगरसेवक शिवाजीआप्पा कोळी, प्रताप गंगेकर यांचे समवेत या भागातील नागरिक गुरूवारी खा.बनसोडे यांचे मार्फत रेल्वेच्या अधिकार्यांना भेटणार आहेत.











0 Comments