Today Headlines

दिवसभराच्या ठळक घडामोडी
संकलन - दत्तात्रय नवत्रे

*ठाण्यातील कोर्टाबाहेर गणेश शिंदे या व्यक्तीने पोलिसांच्या गाडीची तोडफोड केल्याचे वृत्त आहे,घरून आलेला जेवणाचा डबा देण्यास पोलिसांनी नकार दिल्याने त्याने पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली, त्याच्या विरोधात ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*हॅलिकॉप्टर खरेदी प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने इटली मधील दोन कंपन्यांना समन्स बजावले आहे.

*- जखमी कार्यकर्त्यांची किरण बेदींनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली

*- छत्तीसगड येथील कांकेर येथे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकित १२ पोलीस जखमी, जखमींमध्ये वरीष्ठ पोलीस अधिका-यांचा समावेश आहे

* किरण बेदी यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

*- राजकरणात हिंसा हा पर्याय असू शकत नाही - आप

*- दिल्लीत किरण बेदी यांच्या कार्यालयावर वकिलांचा हल्ला.

* छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात दोन पोलिस शहीद, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता, पोलिस - नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु.

* बेळगाव नाट्यसंमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.

* कोलकाता येथील बाउबाजार येथे भीषण आग, अग्निशमन दलाच्या २० बंब घटनास्थळी दाखल, सुमारे १५ जण जखमी झाल्याचे वृत्त.

*- कोल्हापूरच्या लाचखोर महापौरांची गय करणार नाही - अजित पवार

*- आम आदमी पक्ष हा खोट्यांचा कारखाना आहे, आप काळा पैसा देणगी स्वरुपात स्वीकारते - भाजपा नेते पियूष गोयल यांची घणाघाती टीका

*- छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, तीन पोलिस जखमी.

* भाजपा आता घाबरली असून पराभव टाळण्यासाठी ते विषाचे राजकारण करत आहेत - अरविंद केजरीवाल यांचे टीकास्त्र

* विश्वचषकात विजेतेपद पटकावण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला युवराज सिंगसारख्या खेळाडूची गरज - विरेंदर सेहवाग, माजी क्रिकेटपटू

* - सलग दुस-या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ६०.६८ अंकानी घसरुन २९,१२२.२७ अंशांवर बंद झाला तर निफ्टी ११.५० अंशांनी घसरुन ८,७९७ अंशावर बंद झाले.

*- आम्हाला मिळणा-या देणग्यांची चौकशीसाठी तयार, खात्यात जमा होणा-या देणग्यांचा तपशील जाहीर करणार आप हा एकमेव पक्ष - योगेंद्र यादव, आपचे नेते

* - विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाला खराब फॉर्म आणि नकारात्मक मानसिकतेमधून बाहेर पडण्यासाठी फक्त एका विजयाची गरज - माजी क्रिकेटपटू कपिल देव

* महाराष्ट्राचा नेट बॉल खेळाडू मयुरेश पवारचा मृत्यू, केरळमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान हॉर्टअॅटॅकने झाला मृत्यू.

* नरेंद्र टंडन यांचा राजीनामा मागे, अमित शहांची भेट घेतल्यावर राजीनामा मागे घेतल्याचे वृत्त, सोमवारी सकाळी किरण बेदींच्या कार्यपद्धतीला कंटाळून दिल्ली भाजपाचे निवडणूक प्रभारी टंडन यांनी राजीनामा दिला होता.

*- आम आदमी पक्षावर बोगस कंपन्यांकडून देणगी स्वीकारल्याचा आरोप करणा-या संस्थेला भाजपाचे आर्थिक पाठबळ - आम आदमी पक्षाचा पलटवार

*- जळगावमधील वालचंद रायसोनी पतसंस्थेच्या संचालकांसह १३ जणांना अटक.

*माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची ५ फेब्रुवारीरोजी दिल्लीतील हरिनगर येथे होणारी सभा रद्द, दिल्ली पोलिसांकडून परवानगी मिळवण्यात अपयश.

* गडकरी, मुंडे, खडसे, दानवे यांच्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर दिले का हे जाहीर करावे - अजित पवारांचे सहकारमंत्र्यांना खुले आव्हान.

*काम करताना पक्षाचे नाव खराब होऊ देऊ नका - अजित पवार, कोल्हापूरच्या महापौरांना लाचखोरीप्रकरणी अटक झाल्यानंतर पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला.

*दिल्लीतील एनजीओ आवामने आम आदमी पक्षावर चार बोगस कंपन्यांकडून ५० लाख रुपयांची देणगी स्वीकारल्याचा आरोप केला.

* नाशिकमधील ओझर विमानतळ पार्टी प्रकरणी दोषींवर कारवाई करू, कुणाचीही गय केली जाणार नाही - चंद्रकांत पाटील.

* - कोल्हापूरमधील ऊसतोडणी कामगारांच आंदोलन स्थगित, आजपासून ऊसतोडणी पुन्हा सुरू होणार. १६ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार बैठक.

* कोणत्याही देशाने दलाई लामा यांची भेट घेतल्यास चीनचा त्याला विरोधच राहील - चीनचे परराष्ट्र मंत्री

* छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, भ्रष्टाचार प्रकरणात भुजबळ यांची SIT चौकशी होणार, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश कायम.
____________________________________

Post a Comment

0 Comments