महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकटाची चाहुल....

पंढरपूर लाईव्ह

बुधवार दि.4 मार्च 2015

मुंबई : राज्यात मुंबईसह कोकण, नाशिकमध्ये अवेळी पाऊस कोसळला. यामुळे शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. आंबा, द्राक्ष आदी पिकांचे मोठे नुकसान झालेत. पुढील तीन दिवस पुन्हा गारांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागने वर्तविला आहे.

अस्मानी संकटानं कंबरडं मोडलेल्या राज्यातल्या बळीराजासाठी पुन्हा चिंता निर्माण करणारी ही बातमी आहे. पुढील तीन-चार दिवसांत राज्यात गारांसह पावसाचा अंदाज कुलाबा वेध शाळेनं व्यक्त केलाय. भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरील केरळ आणि श्रीलंकेत कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय. त्यामुळं ७, ८ आणि ९ मार्चला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात गारांसह पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती  कुलाबा वेध शाळेच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुत्ते  यांनी दिली.

गेल्या आठवड्यात राज्यातल्या काही भागांत अवकाळी पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसानं केलं. आता गारपीट झाल्यास उरलंसूरलं उत्पन्नही बळीराजाच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतक-यांनी आताच खबरदारीचे उपाय योजण्याचं आवाहनं कुलाबा वेधशाळेनं केलंय.

***

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 4 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   68 हजार 610 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 826 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









 

 



Post a Comment

0 Comments