नेपाळमध्ये अडकलेले 540 भारतीय मायदेशी परतले, वायूसेनेचं बचावकार्य....

पंढरपूर लाईव्ह- :

नवी दिल्ली : नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं वायूसेनेच्या मदतीनं मोठं बचाव कार्य सुरू केलं आहे. आज पहाटे सहा वाजेपर्यंत एकूण 540 भारतीय पर्यटकांना मायदेशी आणलं आहे.  55 भारतीयांना आणणारं वायूसेनेचं पहिलं विमान रात्री 11 च्या सुमारास दिल्ली विमानतळावर उतरलं. त्यानंतर रात्री दीड वाजता 102 भारतीयांना दुसऱ्य़ा विमानानं परत आणलं. तर सकाळी 4 च्या सुमारास तीसरं विमान नवी दिल्लीत आलं ज्यामधून 152 भारतीयांना परत आणलं.  यानंतर मग सकाळी 6 वाजता चौथं विमान दिल्लीत पोहोचलं ज्यामधून 231 भारतीय परतले. मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तर अनेकांना अश्रू अनावर झाले.

जगभरातून मदतीचा हात

 नेपाळमध्ये भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी अनेकांनी संसार उघड्यावर पडलेत,.. मृतांचा आकडा तासागणीक वाढत चालला आहे. तर अजूनही हजारो लोक मृत्यूशी झुंज देत आहे. या नैसर्गिक आपत्तीतून नेपाळला सावरण्यासाठी जगभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे.

 भारतानं नेपाळमधल्या जखमींच्या उपचारासाठी सर्व सोयी सुविधांनीयुक्त असं आत्याधुनिक रूग्णालय नेपाळमध्ये उभारलं आहे. आज सकाळपासून हे रुग्णालय काठमांडूत आपलं काम सुरू करेल. भूकंपग्रस्तांना लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधा या रुग्णालाय असतील.  याशिवाय पुढचे आठ दिवस 24 तास काम करण्यासाठी लागणारं साहित्य या रुग्णालासाठी काल रात्री उशिरा नेपाळमध्ये भारतीय वायूसेनेच्या विमानानं पाठवण्यात आलं आहे.
 भारतासह इस्त्राईल, पाकिस्तान, इंग्लंड, अमेरिका हे देशही अशीच रूग्णालयं उभारत आहेत. भारतातून अडीचशेपेक्षा जास्त एनडीआरएफचे जवान नेपाळमधल्या बचावकार्यासाठी पाठवण्यात आले आहेत. तर 2300 टन खाण्या-पिण्याचं साहित्य नेपाळमध्ये पोचवण्यात आलं आहे.

*****


पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 26 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 86 हजार 727 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 328 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399




 

Post a Comment

0 Comments