हाहाकार
======================
भूकंपाचे हादरे नेपाळला बसले
इतिहासकालीन जमीनदोस्त झाले
हाहाकार तांडव क्षणात माजले
मनीध्यानी नसलेले अचानक घडले
कोण सरावैरा धावत सुटले
क्षणभरात रस्त्यावर काहीजण आले
कोण ढिगा-याखाली पुरते गाढले
क्षणात स्वर्गाच्या रागेत थांबले
कोण मरण यातना सोसत पडले
सारे काही अंधारमय झाले
कोण बॉम्बच्या भयाने धावले
चेगराचेंगरीत काहीजण दगावले
कोण मुलाबाळांच्या शोधात गुंतले
रडारड करून नाही हाती लागले
कोण आईबाबांविना पोरके झाले
रडून रडून डोळे लिंबावानी सुजले
नेपाळ सरकार कमाल लागले
मदतीचे हात जगभरातून सरसावले
निसर्गाला आता नक्कीच वेढ लागले
निष्पाप लोकांचा बळी घेऊन काय मिळाले?
=====================
कवी राजेंद्र झुंबर भोसले, पंढरपूर
मो.९८२२७८१३६५

0 Comments