पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):
सातारा : छत्रपती शिवरायांच्या घराण्यावर टीका कराल तर... जीभ हासडून हातात देईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयन राजे यांनी रामराजे निंबाळकरांना दिला आहे. उदयनराजे साताऱ्यात बोलत होते. मागील काही दिवसापासून रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला आहे. परस्परांवरील या टीकेमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
नीरा नदीचं पाणी बारामतीला पळवलं जातं असा आरोप उदयनराजेंनी केला होता. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यावर प्रत्युत्तर देत उदयनराजेंना फक्त बाटलीपुरतं पाणी माहिती आहे, असं रामराजेंनी म्हटलं होतं. त्यानंतर हा वाद सुरु झाला आहे. यानंतर "मी कधीच गटार बांधले नाही पण भ्रष्टाचाऱ्यांची थडगी बांधतो," अशा शब्दात उदयनराजेंनी टीका केली होती.








0 Comments