मंगेश कराड एम.आय.टी.पुणे यांचे वाढदिवसा निमित्त मॅट अंथरण्याचा शुभारंभ

पंढरपूर ः - श्रीमती प्रयाक्का कराड महिला प्रतिष्ठान व यशोदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मा.मंगेश कराड एम.आय.टी.पुणे यांचे वाढदिवसा निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरासमोरील महाद्वाराच्या रस्त्यावर भाविकांच्या पायाला उन्हाची झळ पोहोचू नये म्हणून मॅट अंथरण्याचा शुभारंभ पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री भारतनाना भालके यांचे शुभहस्ते करण्यात आला.


सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष श्री सुधीर धुमाळे होते. यावेळी ह.भ.प.वीर महाराज, ह.भ.प.जोगदंड महाराज, मा.नगरसेविका सौ.चोले तसेच सर्वश्री दत्तामामा बडवे, सुहास भाळवणकर, सुभाष हुंगे-पाटील, विलास येवनकर, वाडेकर, भाऊ तेलंग, अशोक डोळ, नागेश अधटराव, पालकर, सोमनाथ काटे, वासंदी किशोर बडवे यांचेसह बहुसंख्य भाविक उपस्थित होते.

आमदार श्री भालके यांचा सत्कार श्री बल्लाळ जोशी(परिते) यांनी केला. कार्यक्रमाचे स्वागत सौ.संध्याताई द.बडवे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री श्रीपाद बडवे यांनी केले.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पार्वतीबाई बडवे महिला प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

**********************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 24 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 86 हजार 139 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 260 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399





Post a Comment

0 Comments