विश्‍वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीने महिला कामगारांना साडी वाटप

पंढरपूर लाईव्ह

भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 व्या जयंती निमित्ताने येथील शिवतिर्थावर विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीने सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते महिला कामगारांना साडी वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.भारत भालके हे होेते.या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

       यावेळी बोलताना आ.भारत भालके म्हणाले की,विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षे न्याय्य हक्कापासुन वंचीत राहीलेल्या समाजास आपल्या हक्काची जाणीव करुन दिली.आज जयंती उत्सव साजरा करीत असताना त्यांच्याप्रती असलेल्या नितांत आदर आणि श्रध्देने प्रत्येकाचे उर भरुन आलेले दिसुन
    या कार्यक्रमात किशोर शिंदे यांना बॅरीस्टर पदवी मिळाल्याबद्दल भिम स्मृती पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला.तर पोलीस निरिक्षकपदी निवड झाल्याबद्दल वैभव रोंगे यांचा व पंढरपूर पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष हरिभाउ  प्रक्षाळे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास किरण घाडगे,नगरसेवक शकुर बागवान,नामदेव भुईटे,दिपक चंदनशिवे,आशाताई बागल,महादेव भालेराव,महादेव देठे,रामचंद्र ननवरे,भारत माळी,गुरु दोडीया आदी उपस्थित होते.
      यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे,विठ्ठल अभियांत्रीकीचे प्राचार्य बी.पी.रोंगे,दिलीप देवकुळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुदाम गायकवाड यांनी केले.सुत्रसंचालन विलास जगधने सर यांनी केले.शेवटी आभार अनिल ननवरे यांनी व्यक्त केले.
 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीवविजय वाघ,परमेश्‍वर गोडसे,दिपक नाईकनवरे,किशोर खिलारे,बाबासाहेब चंदनशिवे,दि.बा.शेळके,लखन ठावरे,उमेश सासवडकर,मोहन शिंदे,किरण ठावरे,आनंद सोमासे,प्रभाकर गायकवाड,रमेश सासवडकर,भैय्या सर्वगोड,सुधिर घोडके,सुहास जाधव,प्रशांत आठवले,महेश साठे,मुकेस लकेरी,अनिल सरवदे यांच्यासह प्रतिष्ठाणच्या असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ:- डॉ.आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीने महिला कामगारांना साडी वाटप करताना कल्याणराव काळे,यावेळी उपस्थित आ.भारत भालके ,नागेस भोसले,बी.पी.रोंगे सर,प्रतिष्ठाणचे संस्थापक डि.राज सर्वगोड आदी.
येते.प्रतिष्ठाणच्या वतीने सतत विविध उपक्रम राबवीत असल्याचे आपण पहात आलो असुन संघटीत झालेला आजचा युवक जेव्हा विधायक उपक्रमात हिरहिरीने सहभागी होतो तेव्हा त्याला निश्‍चीतच विधायक रुप आलेले पहावयास मिळते.
  डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवीले जातात.विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करीत असताना समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचे भान ठेवत प्रतिष्ठाणच्या वतीने घरेलु व खाजगी महिला कामगार यांना सहकार्य करण्याच्या भावनेने साडी वाटप करण्यात येत असल्याची माहीती प्रतिष्ठाणचे संस्थापक डि.राज सर्वगोड यांनी यावेळी दिली.

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 18 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 85 हजार 003हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 103  झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399





Post a Comment

0 Comments