वादग्रस्त अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा काल आणि आज

पंढरपूर लाईव्ह

वादग्रस्त अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा आज 30 वर्षांची झाली आहे. 11 फेब्रुवारी 1984मध्ये हैदराबाद येथे जन्म झाला. तिची आई मुस्लिम आणि वडील ईसाई आहेत. शर्लिन एक मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने मोजक्याच सिनेमांत काम केले आहे. तिने मॉडेलिंगच्या काळात मिस हैद्राबाद हा किताब आपल्या नावी केला होता. हैदराबादच्या स्टेनली गर्ल्स हाय स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. वयाच्या 16व्या वर्षीच इंडस्ट्रीकडे कल दाखवला आणि शर्लिन पहिल्यापासूनच बोल्ड इमेजमुळे चर्चेत राहिली आहे.

मुंबईमध्ये शर्लिनला स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. संघर्षाच्या काळात ती दिसायला तर सुंदर होती, मात्र अभिनेत्री होण्यासाठी तिच्याकडे एक्स-फॅक्टर नव्हता. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात झिरो फिगरसह मॉडेलिंगमधून केली. ती ऑकेस्ट्रामध्ये गाणेसुध्दा गायला लागली होती. हळू-हळू तिने पैसे जमा करण्यास सुरुवात केली आणि तिला बी-ग्रेड सिनेमांत काम करण्याची संधी मिळायला लागली. त्यानंतर ’प्लेबॉय’ने मासिकाने तिला लोकप्रिय होण्याची संधी दिली. या या मासिकावर खूपच उत्तेजक दिसली. तिने या मासिकासाठी न्यूड पोजसुध्दा दिल्या होत्या, त्यामुळे ती वादात अडकली होती.
शर्लिनला ’कामसूत्र 3ऊ’मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला. शर्लिनने या सिनेमात अंगप्रदर्शाच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. मात्र तिने सिनेमाचा दिग्दर्शक रुपेश पॉलवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आणि सिनेमा सोडण्याची धमकी दिली होती. दोघांचा ट्विटर वार चांगला रंगला होता आणि हे प्रकरण मीडियामध्ये चर्चिले गेले होते.
बालपणी अगदीच साधी असणा-या शर्लिनला पार्टी किंवा पिकनिकमध्ये आवड नव्हती. वयाच्या 15व्या वर्षी शर्लिनने स्वतःत बदल घडवून आणण्याचे ठरवले. मेकओवर केल्यानंतर तिची अभ्यासातील आवड कमी झाली आणि तिने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला.

******************************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 8 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 81 हजार 365 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 7 हजार 606 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399




Post a Comment

0 Comments