पंढरपूर 28:-
भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून जनहितार्थ झालेल्या ‘‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’’ व ‘‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा’’ पंढरपूर अर्बन बँकेच्या खातेदारांना लाभ घेता येणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी दिली. या संदर्भात पंढरपूर अर्बन बँक व दि.न्यु इंडिया अॅश्युरन्स यांच्या सामंजस्य करार झाला असून बँकेच्या खातेदारांच्या हितासाठी ही योजना कार्यान्वित केली असल्याची यावेळी ते म्हणाले.
सदर विमा योजनेची सविस्तर माहिती सांगताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण डिंगरे म्हणाले की, ग्राहकांना दर्जेदार सेवा देणेस अग्रगण्य असणारी आपली दि.पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर व दि.न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. बँकेच्या कोणत्याही शाखेच्या खातेधारकास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याचा कालावधी दि.1 जून ते 31 मे पयरत असून ही योजना 18 ते 50 वयोगटातील बचत खातेदारांसाठी आहे. याचा वार्षिक हप्ता रू.330/- असून कोणत्याही कारणास्तव मृत्यु आल्यास वारसाला रू.2 लाखाचे विमा संरक्षण मिळणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचा कालावधी दि.1 जून ते 31 मे पयरत ही योजना 18 ते 70 वयोगटातील बचत खातेदारांसाठी आहे. याचा वार्षिक हप्ता रू.12/- असून अपघाती अथवा कायमचे अपंगत्व आल्यास विमा संरक्षण खातेदारास मिळणार आहे. मात्र कोणत्याही एका बँकेतील एकाच खात्यास या योजनेचा लाभ घेता येईल.
तरी जास्तीत जास्त खातेदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे चेअरमन प्रशांत परिचारक, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण डिंगरे, जनरल मॅनेजर उमेश विरधे सर्व संचालक मंडळांनी केली आहे.
आमचे ई-मेल आयडी jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com

*******

0 Comments