पंढरपूर लाईव्ह:-
पंढरपूर - शतकमहोत्सवी दि.पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेच्या शाखा-साखरपेठ, सोलापूर चा नुतन वास्तुचा लोकार्पण सोहळा विधानसभेचे सभापती मा.श्री.हरिभाऊजी बागडे यांचे शुभहस्ते नुकताच पार पडला. उद्घाटनप्रसंगी वास्तुच्या कोनाशिलेचे अनावरण हरिभाऊजी
बागडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बँकेचे चेअरमन श्री.प्रशांत परिचारक म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या पंढरपूर अर्बन बँकेची 42 वर्षापुर्वी साखरपेठ, सोलापूर येथे शाखा स्थापन झाली. शहरातील यंत्रमाग व्यावसायिक, भांडवलदारांना मराठी, कन्नड, तेलगु, हिंदी अशा बहुभाषिकांची राजधानी असणार्या सोलापूर शहारातील ग्राहकांनी बँकेवर जो विश्वास दाखविला आहे, त्यांच्या विश्वासास आम्ही सदैव पात्र राहून अधिक दर्जेदार सुविधा देण्यास निश्चितच प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. याप्रसंगी केंद्र सरकारची प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’’ व पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना’’ खातेदारांसाठी लवकरच कार्यान्वित करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
महाराष्ट्रातील ग्राहकांचा विश्वासस पात्र असणार्या पंढरपूर अर्बन बँकेचा समाजात फार मोठा नावलौकीक असून प्रामाणिकपणा, निष्ठा व सचोटी याच्या जोरावरच बँक यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहे. बँकेच्या पुढील उज्वल वाटचालीस याप्रसंगी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपात बँकेचे कुटुंबप्रमुख सुधाकरपंत परिचारक म्हणाले की, संस्थापकांनी घालून दिलेल्या आदर्श मापदंडावरती बँकेचे कामकाज चालू आहे. ग्राहकांच्या बदलत्या आकांशाचा वेध होत त्यांना दर्जेदार सोई-सुविधा देणेसाठी साखरपेठ शाखा नव्या वास्तुमध्ये आपणासमोर येत आहे. आधुनिक सोयी-सुविधा देऊन बँकी ंग सोपे करण्यावर आमचा भर असेल असे ही ते म्हणाले, सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री.बिपीनभाई पटेल, जेष्ठ साहित्यीक श्री.गो.मा.पवार, डॉ.नितीन ढेपे, शाखा सल्लागार श्रीकिसन लाहोटी, संगमेश्वर रघोजी, श्री.लक्ष्मणराव ढोबळे, बँकेचे संचालक श्री.सतिश पुरंदरे, श्री.रा.पा.कटेकर, श्री.पुरूषोत्तम खडके, श्री.गोपाळ बडवे, श्री.दिपक शेटे, श्री.बाळासाहेब देहुकर, मेधा दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.लक्ष्मण डिंगरे, जनरल मॅनेजर श्री.उमेश विरधे, श्री.गोविंद लाहोटी, शाखाधिकारी श्री.कृष्णकुमार पेंडाल, श्री.उमेश कुलकर्णी, श्री.संजय पाठक, श्री.विजय माने सर्व कर्मचारी बंधु परिश्रम घेतले.
*****







0 Comments