जिल्हाधिकारी तथा मंदीर समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी केली विठ्ठल मंदीराची पहाणी

 जिल्हाधिकारी तथा मंदीर समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी केली  विठ्ठल मंदीराची पहाणी
   

 जिल्हाधिकारी तथा मंदीर समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी आज  विठ्ठल-रुक्मिणी मंदीराला भेट देवून मुखदर्शन, दर्शनमंडप,तसेच  मंदीरातील विविध ठिकाणची पाहणी करुन माहिती घेतली. 

            यावेळी ‍ जिल्हाधिकारी तथा मंदीर समितीचे अध्यक्ष श्री.मुंढे यांनी रविवारी  दिनांक 21 जून 2015 पासूण आषाढी यात्रे पर्यंत  श्रींचे दर्शन भाविकांसाठी  24 तास ख्रुले ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच भाविकांच्या सोईसाठी तांत्रिक बाबी तपासूण मोबाईल स्कॅनर लवकरच  सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रारंभी  जिल्हाधिकारी तथा मंदीर समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने श्री.मुंढे यांचा सत्कार मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने  यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व श्रींची प्रतिमा देवून करण्यात आला.याप्रसंगी  प्रांतधिकारी संजय तेली]तहसिलदार गजानन गुरव, न.पाचे मुख्यधिकारी शंकर गोरे, मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन तसेच समितीचे कर्मचारी उपस्थित होते. 

*************************


जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com



Post a Comment

0 Comments