पालखी तळांची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी

  पंढरपूर दि.26:  जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर  माऊली  पालखी  सोहळ्याचे आगमन दिनांक 21 जुलै तर जगदगुरु तुकाराम  महाराज पालखी सोहळ्याचे आगमन दिनांक  22 जुलै 2015 रोजी होणार असून, या पालखी सोहळ्यात सोबत येणा-या भाविकांसाठी पालखी तळावर करावयाच्या सेवा-सुविधांच्या बाबतची पाहणी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केली. सोहळ्यासमवेत येणा-या भाविकांची संख्या प्रतिवर्षी वाढत असून, येणा-या भाविकांना प्रशासनाकडून देण्यात येणा-या सेवासुविधा बाबत जिल्हाधिकारी मुंढे यांनी संबधीत विभागांना सुचना केल्या  यामध्ये  पालखी तळावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.  वीज वितरण कंपनीने अखंडीत व पुरेसा वीज पुरवठा करावा.

वाहनांची कोंडी होवू नये यासाठी  वाहतूक विभागाने पर्यायी वाहतूक मार्गार्ची व्यवस्था करावी. बांधकाम विभागाने रिंगण होणा-या ठिकाणी  दगड व काटेरी झुडपे काढावीत तसेच पालखी तळावर चिखल होणार नाही
याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याची  तपासणी करुन विहिरी तसेच बोरवेल असणा-या ठिकाणी  पाणी ‍पिण्यास योग्य अथवा अयोग्य असे ठळक फलक लावावेत व आवश्यक वैद्यकीय सेवा सुविधा पुरवण्यात याव्यात तसेच अन्य सुविधा व स्वच्छतेबाबत ग्रामपंचात व ग्रामसेवकांना योग्य सुचानाही जिल्हाधिकारी तुकाराम मुढे यांनी दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा पोलिस अधिक्षक एस.विरेश प्रभू, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण देवरे, निवासी उप-जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा दुबोले, प्रांतधिकारी संजय तेली,  मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी  शिवाजी  कादबाने, तहसिलदार गजानन गुरव ,कार्यकारी अभियंता एस.टी. राऊत, तालुका पोलिस निरिक्षक दयानंद गावडे,  पाटबंधारे विभागाचे  एस.टी. ‍ शिंदे यांच्यासह संबधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते

                                                      000000

********************

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com





Post a Comment

0 Comments