पंढरपूरच्या सौ.अंजली बडवे यांना जिल्ह्यातील पहिल्या महिला स्पीच थेरेपीस्ट होण्याचा मान.....! बी.एड्. इन स्पेशल एज्युकेशन विशेष प्राविण्य

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी) 

पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ एज्युकेशन- हिअरिंग इंपेअर्ड या पदवी परीक्षेत सौ.अंजली अनिरुद्ध बडवे यांनी प्रथम श्रेणी प्राप्त करून त्या चाईल्ड सायकॉलॉजी मधून स्पेशल बी.एड्. असणार्‍या सोलापूर जिल्ह्यामधील पहिल्या महिला ‘स्पीच थेरपीस्ट’ बनल्या आहेत.

गत दोन वर्षांपासून रूबी हॉल, पुणे’चे एच.आय. विभागाचे प्रमुख डॉ.आशुतोष दुबे, डॉ.रुक्मिणी बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. बडवे यांनी विविध प्रोजेक्ट पुणे विद्यापीठाला सादर केले. डॉ. दुबे यांच्या माध्यमातून त्या शब्द स्पीच थेरेपी सेंटरचे पंढरपुरात संचालन करीत आहेत.

पुणे विद्यापीठाने एप्रिल 2015 मध्ये घेतलेल्या बी.एड्. इन स्पेशल एज्युकेशन या विशेष प्राविण्य परीक्षेत सौ.बडवे यांनी ऑडिओलॉजि, विशेष मुलांकरिता (कर्णबधीर) शिक्षण नियोजन व व्यवस्थापन, एज्युकेशनल सायकॉलॉजी अ‍ॅण्ड पर्सन विथ डीसअ‍ॅबिलीटी, डेव्हलपमेंट ऑङ्ग लँग्वेज अ‍ॅण्ड कम्युनिकेशन स्कील्स विथ चिल्ड्रेन विथ एच.आय. या विषयामध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे.
गेल्या दोन वर्षापासून त्यांनी पुण्याच्या मॉडर्न कॉलेज ऑङ्ग स्पेशल एज्युकेशन या महाविद्यालयातून शिक्षण घेतले. यापुढे सोलापूर जिल्ह्यात शिक्षणाच्या प्रवाहापासून
बाजूला राहिलेल्या कर्णबधीर मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्पीच थेरपी सेंटरच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

या वर्षी झालेल्या परीक्षेत पुणे विद्यापीठाच्या या केंद्रातून केवळ सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये पुणे येथील पूजा यंदे या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत तर श्री.निखील किरवले यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. पंढरपुरातील मार्गदर्शक डॉ.शीतल शहा, डॉ.रुक्मिणी बागडे, डॉ.देवकाते, डॉ.अरिङ्ग बोहरी यांनी आय.एम.एस.च्या वतीने अभिनंदन केले आहे.

************************


जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com



 

Post a Comment

0 Comments