‘पोलिस मित्र’ संकल्पना यशस्वीरित्या राबविणेसाठी पंढरपूरच्या सुज्ञ नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत- किशोर नावंदे (पोलिस निरीक्षक-पंढरपूर शहर पोलिस) 25 ऑक्टोबरला नागालॅन्ड मागील सिंघण हॉलमध्ये बैठकीचे आयोजन

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- 23 ऑक्टोबर 2015

             पंढरपूर शहरातील नागरिक व पोलिसांमध्ये समन्वय रहावा, शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी  यासाठी आम्ही पोलिस मित्र ही संकल्पना राबवित असून यासाठी पंढरीतील सुज्ञ नागरिकांचे सहकार्य पोलिसांना मिळावे अशी अपेक्षा पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांनी व्यक्त केली. नुकतीच सहयोग नगर मधील यशवंत डोंबाळी (सर) यांच्या निवासस्थानी याबाबत उपनगरातील कांही नागरिकांसमवेत यासंदर्भात झालेल्या एका मिटींगमध्ये ते बोलत होते. येत्या 25 ऑक्टोबर 2015 रोजी सायंकाळी 5 वाजता लिंकरोड व इसबावी परिसरातील नागरिकांसाठी येथील नागालॅन्ड मागील सिंघण हॉल येथे एका मिटींग चे आयोजन केले आहे. 

                पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांच्या सरक्षेच्या दृष्टीने पंढरपूर शहर पोलिस तत्पर आहेतच मात्र येथील नागरिकांचेही पोलिसांना सहकार्य लाभावे यासाठी आम्ही पोलिस मित्र ही संकल्पना राबविणार आहोत. यामध्ये पंढरपूर मधील अनेक सुज्ञ नागरिकांना सहभागी करुन घेत. त्यांना पोलिस मित्र बनवण्यात येईल. जेणेकरुन रात्री आमचे पोलिस शहराच्या विविध भागात पेट्रोलिंग करत असताना त्यांचेसोबत त्या-त्या भागातील पोलिस मित्र कांही  तास रहातील. स्थानिक रहिवाशी असल्यामुळे आपल्या भागाची माहिती अशा नागरिकांना उत्तम असते. त्यामुळे पोलिसांनाही याबाबत मदत मिळेल. तसेच पोलिस मित्र बनलेलेल्या नागरिकांकडून आपापल्या भागात घडणार्‍या कांही अनुचित घटनेबाबत माहिती मिळताच याबाबत पोलिसांना माहिती देऊन शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठीआपले योगदान देता येईल. यासंदर्भात शहराच्या विविध भागात बैठक-मिटींग आयोजित करुन पोलिस मित्र संकल्पनेविषयी सविस्तर माहिती देऊन नागरिकांना यामध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी किशोर नावंदे यांनी दिली. पोलिस मित्रांसाठी टी शर्ट, काठ्या, ओळखपत्र आदी देण्यात येईल. तसेच पोलिसांकडून त्यांना शक्य ते उचीत सहकार्य मिळेल तरी पंढरपूरमधील नागरिकांनी यासाठी आपला उतस्फुर्त सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
              सहयोग नगर मध्ये पार पडलेल्या या मिटींग ला यशवंत डोंबाळी, आदित्य फत्तेपूरकर, भगवान वानखेडे, गणेश सिंघण, समीर दिवाण, विनोद भरते, अ‍ॅड.प्रमोद सावंत, गणेश धांडोरे (सर) आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या पोलिसांकडून अपेक्षा व पोलिसांच्या नागरिकांकडून अपेक्षीत असणारे सहकार्य व उपनगरातील विविध शैक्षणिक संस्था व शैक्षणिक क्लासेस परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजना यावरही चर्चा झाली. यावेळी येत्या रविवारी 25  ऑक्टबरला येथील सिंघण हॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता एका मिटींगचे आयोजन करण्याचे ठरले असून या मिटींगसाठी स्वत: श्री.नावंदे हे उपस्थित राहून यासंदर्भात अधिक माहिती देणार आहेत. तरी इसबावी व लिंकरोड परिसरातील तसेच गणेश नगर, मनिषा नगर, शासकीय वसाहत आदी भागातील  जबाबदार सुज्ञ नागरिकांनी याठिकाणी वेळेत अवश्य उपस्थित  रहावे. आपल्या भागातील समस्या असतील तर त्या ही या मिटींगमध्ये व्यक्त कराव्यात. तसेच पोलिस मित्र संकल्पनेबाबत अधिक माहिती घेऊन यामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री.नावंदेसाो यांनी केले आहे.
       अधिक माहितीसाठी यशवंत डोंबाळी (9922040011), भगवान वानखेडे (8308838111), गणेश सिंघण (7588599995) व अविनाश फत्तेपूरकर (9890577977) यांच्याशी संपर्क साधावा.
_________________


 



       

Post a Comment

0 Comments