मुलाच्या विवाहाप्रित्यर्थ वाखरी येथील लोंढे कुटूंबियांचा सिंगापूर दौरा... चि. सागर शंकरराव लोंढे चा 27 ऑक्टोबर ला सिंगापूरमध्ये विवाह सोहळा... पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सागरने विदेशात मिळवले दैदिप्यमान यश....

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- 19 ऑक्टोबर 2015

             मुळचे पंढरपूर तालुक्यातील ईश्‍वर वठार येथील श्री.शंकरराव लोंढे व धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.राजश्री शंकरराव लोंढे या दांपत्याची मुले उच्चशिक्षीत असून दोघांनीही आपापल्या क्षेत्रात मोठ्या हिकमतीने यश मिळविले आहे. त्यांचे थोरले सुपूत्र शरदचंद्र लोंढे हे दिल्ली येथे कार्यरत असून धाकटे सुपूत्र चि.भगतसिंह (सागर) लोंढे (B.E. Instrumentation Engineer) सिंगापूर येथील ‘हनीवेल’ या कंपनीत सिनीअर ऑटोमेशन इंजिनिअर या पदावर कार्यरत आहे. दि. 27 ऑक्टोबर 2015 रोजी सागरचा सिंगापूरमध्ये विवाह सोहळा असून त्याच्या विवाहाच्या निमित्ताने लोंढे कुटूंबिय सिंगापूर ला जाणार आहेत. लोंढे कुटूंबियांच्या या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विविध स्तरातील अनेकांच्या शुभेच्छा मिळत आहेत.


                     श्री.शंकरराव लोंढे व सौ. राजश्री लोंढे हे सध्या वाखरी येथे स्थायीक असून श्री.शंकरराव लोंढे  यांनी अतिशय हिकमतीने आपल्या दोन्ही मुलांना उच्चविभुषीत केल्यामुळे आज पंढरपूर तालुक्याचे नांव चि. सागर विदेशात उज्वल करत आहे. सौ.राजश्री लोंढे यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य उल्लेखणीय आहे. वाखरी ग्रामपंचायतीच्या कारभारात गत निवडणुकीच्या वेळी त्यांनी विशेष लक्ष देवुन सर्वसामान्य कुटंबातील महिला सदस्य निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले आहे. महिला सबलीकरण, नागरिकांचे मुलभुत हक्क आणि विविध सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी लोकशाही मार्गाने लक्षवेधी कार्य केलेले आहे. पंढरपूर तालुक्यात सद्यस्थितीत अनेक कुटूंबात उच्चविभुषीत महिला आहेत मात्र समाजकार्यात तळागाळातील महिलांना सोबत घेवुन अग्रेसर असणार्‍या सौ.राजश्रीताईंचे कार्य नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 
                    त्यांचा धाकटा मुलगा सागर कार्यरत असलेल्या सिंगापूरमधील हनीवेल या कंपनीचे कार्य इंडोनेशिया, मलेशिया अशा पाच-सहा देशात चालु आहे. आपल्या कार्याच्या निमित्ताने सागर अनेक देशात फिरत आहे.  आपल्या मातापित्यांचे सुसंस्कार आणि विठुरायाच्या भुवैकुंठ पंढरी नगरीचा अध्यात्मीक संपन्न वारसा सोबत घेत सागर ने दिवसेंदिवस अशीच प्रगतीची अनेकानेक शिखरे पादांक्रात करावी हीच सदिच्छा...! पंढरपूर लाईव्ह च्या वतीने लोंढे कुटूंबियांना शुभकार्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!  




           

Post a Comment

0 Comments