ग्रामपंचायत निवडणूक कायदा व सुव्यवस्था बैठक संपन्न

            पंढरपूर, दि. 05 :- तालुक्यात होणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणूका निर्भय वातावरणात तसेच सुरळीत पार पडाव्यात यासाठी संबंधीत यंत्रणांनी दक्ष राहावे अशा सूचना उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी दिल्या.


            ग्रामपंचायत निवडणूक कायदा व सुव्यवस्थेबाबतची बैठक उपविभागीय कार्यालयात संपन्न झाली. बैठकीस तहसिलदार गजानन गुरव यांच्यासह पोलीस विभाग व सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

           ग्रामपंचायत निवडणूकींमध्ये आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे  पालन व्हावे, निवडणूका निर्भय वातावरणात व्हाव्यात, मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच निवडणूक  निकालानंतर गावात तणाव निर्माण होणार नाही, याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी अशा सूचना श्री. तेली यांनी बैठकीत दिल्या.


______




 


Post a Comment

0 Comments