गृहनिर्माण मंत्र्यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

        पंढरपूर दि.24-  गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी श्री विठ्ठल मंदीराला  भेट देवून श्री  विठ्ठल-रुक्मीणी मातेचे दर्शन घेतले. विधिवत पुजेनंतर श्री. मेहता  यांचा विठ्ठल-रुक्मिणी मंदीरे समितीच्या वतीने मंदीरे समितीचे कार्यकारी अधिकारी  शिवाजी कादबाने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.

            याप्रसंगी तहसिलदार गजानन गुरव, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्यासह मंदिर समितीचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments