पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि.3 नोव्हेंबर 2015
पत्रकार दिना च्या दिवशी पत्रकार संघाचे तत्कालिन अध्यक्ष सुनिल उंबरे व अभिराज उबाळे यांनी पत्रकार मित्र सत्कार समिती गठीत करून पंढरीतील पत्रकारांचा दिमाखदार गौरव सोहळा आयोजित केला होता. याच सोहळयात नगराध्यक्षांनी पत्रकारांसाठी न.प. च्या शाॅपींग सेंटरमधील एक हाॅल पत्रकार कक्षासाठी देऊ असा शब्द उपस्थित पत्रकारांशी बोलताना दिला होता.
आज नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले यांनी दिलेला शब्द पाळला असून आज नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर मधील हॉल फर्नीचर, विज, पंखा यासह पत्रकार कक्ष साठी पत्रकारांना देण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला आहे.
पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष नवनाथ पोरे व हरिभाऊ प्रक्षाळे, तसेच माजी अध्यक्ष अभिराज उबाळे, सुनिल उंबरे व पंढरपूर च्या सर्व पत्रकार बंधूंच्या लढ्याला अंशतः का होईना पण अखेर यश मिळाले आहे.
पंढरपूर च्या पत्रकारांमधून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.
सर्व पत्रकार बंधूंचे पंढरपूर लाईव्ह कडून अभिनंदन व पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांचे आभार
www.pandharpurlive.com
Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com.apk

0 Comments