सौ.कमल झरकर यांचे निधन

पंढरपूर –दि. 16 नोव्हेंबर 2015
    गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील सौ. कमल गुलाबचंद झरकर (वय -७०)  यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
          त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,सून व नातवंडे आहेत. त्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली. श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार राजेंद्र झरकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या अंत्ययात्रेत स्वेरी परिवारासह गोपाळपूर परिसरातील सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments