पंढरीत 27 व 28 डिसेंबर रोजी स्त्री-पुरुष समतावादी युवकांचे राज्यस्तरीय अधिवेशन


अस्तित्व समाजविकास व संशोधन संस्थेच्या वतीने दिनांक 27 व 28 डिसेंबर रोजी पंढरपूर येथील रामधाम मंगल कार्यालय सांगोला रस्ता येथे स्त्री पुरुष समतावादी व पुरोगामी विचाराच्या युवकांचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजीत करण्यात आले असुन या अधिवेशनाचे उदघाटन महाराष्ट्रातील ज्येष्ठ विधानसभा सदस्य माजी मंत्री मा.गणपतराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.

   या अधिवेशनास ज्येष्ठ सामानिक कार्यकर्त्या विद्या बाळ,सेंटर फॉर हेल्थ अ‍ॅन्ड सोशल जस्टीस नवी दिल्लीचे सतिभ सिंग,सुभाष मेंढापूरकर(हिमाचल प्रदेश),मनिषा गुप्ते ,लता भीसे,आनंद पवार,मनिषा तोकले,एच.पी.देशमुख,डॉ.शशिकांत अहंकारी,साधना दधिच,शहाजी गडहिरे इ.मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार असल्याची माहीती आयोजक प्रविण सुर्यगंध व दत्ता गुळीग यांनी दिली आहे.
    या अधिवेशनासाठी सोलापूर,रत्नागीरी,बीड,पुणे,उस्मानाबाद या जिल्ह्यातील 300 युवक सहभागी होत असुन विविध विषयावर तज्ञाचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहीती संयोजकातर्फे देण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments