इपिलेप्सी शिबिराचा 644 रूग्णांना लाभ

पंढरपूर दि. 21 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे दि. 20‍ डिसेंबर 2015 रोजी आयोजित करण्यात आलेल्या इपिलेप्सी/आकडी अपस्मार (फेफरे/फिट) शिबिराचा 644 रूग्णांनी लाभ घेतला. यामध्ये 400 लहान मुलांचा तर 244 प्रौढ रुग्णांचा समावेश होता. शिबिरात उपचार घेण्यात आलेल्या रुग्णामध्ये 47 रुग्णांची मेंदुची (ईईजी) तपासणी, ॲक्यूपेशनल थेरपीचे 75 रुग्ण, स्पिच थेरपी 96  व टीडीएम 2, एमआरआय 2 रुग्णांचा समावेश होता.

             आरोग्य शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्या हस्ते व मुंबई येथील इपिलेप्सी फौऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. निर्मलकुमार सुर्या, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जून पट्टणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पुणे मंडळाचे सहायक संचालक      डॉ. दर्शने, अतिरीक्त आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोरुलकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, डॉ. अमर जाधव उपस्थित होते.
            इपिलेप्सी/आकडी अपस्मार (फेफरे/फिट) आजार धोकादायक असला तरी योग्य औषोधोपचार व वैद्यकीय सल्याने रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो असे प्रांताधिकारी संजय तेली यांनी यावेळी सांगितले. इपिलेप्सी आजाराबद्दल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने  पंढरपूरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. श्रीनीवास कोरुलकर यांनी प्रास्ताविकात सांगून या आजाराबाबतची सविस्तर माहिती दिली.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरुषोत्तम कदम यांनी केले तर आभार डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी मानले. हा शिबिर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप केंद्रे, डॉ.  बालाजी बिराजदार, डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. आशा घोडके, डॉ. माया शेळके, डॉ. आबा गायकवाड, डॉ. भोसले यांच्यासह  श्री. कलशेट्टी,  राजवाडे, सरवदे, बाजीराव नामदे,  नागेश देवकर, विद्याधर हवेली, सुधीर भातलवंडे, राहूल फराटे, सतीश पाटील, विनायक सावंत, श्रीमती चौधरी, परिचारिका औंबासे, कर्चे, कुलकर्णी, रावळे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments