75 वर्षांचे झाले पवार साहेब.... अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने....

पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज दि. 12-12-2015  

राष्ट्रवादीचे नेते पवार साहेब आज 75 वर्षाचे झाले. पवारसाहेबांचा
अमृतमहोत्सव महाराष्ट्रात सर्वत्र साजरा होईल. राजकारणात जे पवारसाहेबांचे कट्टर विरोधक आहेत, त्यांनाही शरद पवार यांच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, क्षमतेबद्दल कोणालाही कधीही शंका नव्हती आणि नाही. महाराष्ट्रातला कप्पा न कप्पा, व्यक्ती आणि व्यक्ती, गट आणि तट, पक्ष आणि नेते यांची खडानखडा माहिती कोणाजवळ असेल, तर ती पवारसाहेबांच्या जवळ आहे.


        कृती साथ देवो न देवो, सकाळी 7 वाजता दिवस सुरू करणार आणि रात्री 12 वाजता दिवस संपवणार. 16-17 तास काम करणारे राजकारणी या देशात किती असतील माहीत नाही. पण, शरद पवार हे तसे राजकारणी आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. किंबहुना दुस-या अर्थाने जे 24 तास राजकारणच करीत असतात, त्यात शरद पवार यांचाही नंबर लागतो. गेली 50 वर्षे ही उमेद त्यांनी टिकवलेली आहे आणि गेली काही वर्षे तर कठीण अशा आजाराचा मुकाबला करून त्यांनी त्यांच्या इच्छाशक्तीचे सामर्थ्य किती अफाट आहे, याचाही प्रत्यय महाराष्ट्राला दिला आहे.

          त्यांच्याबद्दल, त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटणा-या अतिशय मोठया डॉक्टरांना त्यांना त्यांच्या प्रकृतीचे भाकीत करताना कमालीची काळजी घ्यायला सांगितली होती. त्यावेळी पवारसाहेब त्यांना म्हणाले होते, तुमचे सांगून झाले का? आणि मग म्हणाले, माझी चिंता करू नका. मला 15 वर्षे काही होणार नाही आणि त्यातली 7 वर्षे अगदी हिमतीने, जिद्दीने दिवसभर दगदग करून राजकारणाच्या धबडग्यात पवारसाहेब आजही ठणठणीत आहेत. आता ते रुग्णालयात आहेत. त्यांच्या मांडीच्या हाडाला इजा झाली आहे; पण अशा किरकोळ अपघाताने खचून जाणारा तो नेता नाही. राजकारणात अशी अनेकांची हाडे त्यांनी मोडली आहेत तसेच अनेकांना राजकारणात उंचच उंच नेऊन ठेवले आहे.

                  शरद पवार या व्यक्तिमत्त्वाचे एक पैलू आहेत असे नाही. अनेक पैलू त्यांच्याजवळ आहेत. बारामती परिसर त्यांनी ज्या पद्धतीने चौफेर विकासाने आघाडीवर नेला आहे, त्याला तोड नाही. त्यांचे विद्या प्रतिष्ठान, कृषी प्रतिष्ठान, त्यांचे महिलांचे हॉस्टेल.. एक नाही अनेक संस्था त्यांनी बारामतीत उभ्या केल्या आणि त्या अतिशय व्यवस्थितपणे चालवल्या. जबाबदारी वाटून द्यायची आणि विश्वास टाकून काम करून घ्यायचे, अशी एक विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे त्यांनी अनेक माणसे घडवली. अनेक संस्था उभ्या केल्या आणि हे सर्व करीत असताना त्यांची भूमिका जे विषय माहीत नाहीत, ते विषय नीटपणे समजून घ्यायची तयारी असल्यामुळे ते नेहमी विद्यार्थ्यांच्या भूमिकेत राहताना त्यांना संकोच वाटला नाही. उत्तम शेती करणा-याच्या शेतात जाऊन त्याने केलेल्या विविध प्रयोगांची माहिती घेण्यात त्यांना कधी संकोच वाटत नाही किंवा रघुनाथराव माशेलकर यांच्यासोबत बसून जगातल्या वैज्ञानिक आघाडीवर काय चालले आहे, हे जाणून घेण्यात त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. त्यामुळे असे अनेक विलक्षण गुण असलेला हा नेता आहे.

              वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलेला हा नेता. महाराष्ट्राचे त्या वेळचे थोर नेते यशवंतराव चव्हाण काटयाच्या वाडीला पवारसाहेबांच्या घरी जात होते. पवारसाहेबांच्या आईकडून त्यांनी हा मुलगा काँग्रेससाठी मागून घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे राजकारण ज्या घरात होते त्या माऊलीने यशवंतरावांच्या ओटीत  तिचा हा मुलगा दिला. 1967च्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट दिले. यशवंतरावांना अनेकांनी अशी भीती घातली की, बाबालाल काकडे यांच्यासारख्या तगड्या नेत्याविरुद्ध शरद पवार टिकू शकणार नाहीत. यशवंतरावांनी विचारले, महाराष्ट्रात काँग्रेसच्या किती जागा येणार आहेत? कोणी तरी सांगितले 150.’ यशवंतराव म्हणाले,149 येतील असे समजा. एक जागा  जाईल.’ निवडणूक झाली. शरद पवार 28 हजार मतांनी निवडून आले. त्या दिवसापासूृन लोकसभा असो, विधानसभा असो, त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. निवडणुकीच्या एक दिवस आधी मतदारसंघात जाऊन लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी जिंकण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे आणि तो केव्हा तर इंदिरा गांधींची भीषण हत्या झाल्यानंतरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत राजीव गांधींच्या खालोखाल मते मिळवून काँग्रेसच्या विरोधात ते निवडून आले. आजही महाराष्ट्रात 40-50 आमदारांना निवडून आणणे, हे त्यांनाच जमू शकते. त्यांचा पक्ष म्हणजे तेच आहेत. त्यांना वजा केले तर त्यांचा पक्ष खूप छोटा आहे. शरद पवारांचे मोठेपण हे त्यामध्येच दडलेले आहे.
27व्या वर्षी आमदार, 32व्या वर्षी राज्यमंत्री, 34व्या वर्षी कॅबिनेट मंत्री, 38व्या वर्षी मुख्यमंत्री, 51व्या वर्षी संरक्षणमंत्री असा हा त्यांचा विलक्षण थक्क करणारा प्रवास आहे. 75व्या वर्षी आजही त्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. थकवा नावाची गोष्ट त्यांना माहीत नाही. सकाळी 7 वाजता तयार होणारा त्यांच्याएवढा वक्तशीर नेता दुसरा नाही. राजकीय नेते जेव्हा उठून तयार होत असतात तेव्हा शरद पवार यांचे चार-पाच तासांचे काम झालेले असते. अशी एक विलक्षण ऊर्जा शरद पवार यांच्याजवळ आहे. 75व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.

पवार साहेबांचा झंझावाती प्रवास....

शरद गोविंदराव पवार हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. इ.स. 1978 ते इ.स. 1980, इ.स. 1988 ते इ.स. 1991 व इ.स. 1993 ते इ.स. 1995 या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून फुटून इ.स. 1999 साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.


विद्यार्थी-राजकारणी
पवारांचा जन्म डिसेंबर 12, इ.स. 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. इ.स. 1956 साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले.त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या 24 व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.

इ.स. 1966 साली पवारांना युनेस्को शिष्यव्रुत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.

विधानसभा
सर्वप्रथम इ.स. 1967 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले.श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या 29व्या वर्षी झाला. इ.स. 1972 आणि इ.स. 1978 सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. इ.स. 1978 सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हे ही पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर ’पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला’ अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली..

मुख्यमंत्री
18 जुलै इ.स. 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.ते राज्याचे सर्वांत तरूण मुख्यमंत्री होते. इ.स. 1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली.त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून इ.स. 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने 288 पैकी 186 जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.

लोकसभा
इ.स. 1984 सालची लोकसभा निवडणुक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील 48 पैकी केवळ 5 जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता .मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले .मार्च इ.स. 1985 ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने 288 पैकी 54 जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

परत विधानसभा
इ.स. 1987 साली 9 वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून 1988 मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. 26 जून इ.स. 1988 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसर्‍यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.

नोव्हेंबर इ.स. 1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील 48 पैकी 28 जागा जिंकल्या. पक्षाची राजस्थान,मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत झाली तशी वाताहत महाराष्ट्रात झाली नाही. पण इ.स. 1984 च्या तुलनेत पक्षाने 15 जागा कमी जिंकल्या. शिवसेनेने 4 जागा जिंकून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने 10 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी इ.स. 1990 मध्ये निवडणुका होणार होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपर्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 288 पैकी 141 तर शिवसेना-भाजप युतीने 94 जागा जिंकल्या. राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी 4 मार्च इ.स. 1990 रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसर्‍यांदा शपथ घेतली.

जानेवारी इ.स. 1991 मध्ये विलासराव देशमुख, सुरूपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली. पण त्याला राजीव गांधींनी नकार दिला.

इ.स. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात 48 पैकी 38 जागा जिंकल्या आणि इ.स. 1989 च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. श्री.पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुन सिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने श्री.पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा 21 जून इ.स. 1991 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.

पुनः दिल्ली
नरसिंह रावांनी पवारांना केंद्रिय मंत्रीमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. 26 जून इ.स. 1991 रोजी त्यांचा केंद्रिय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याजागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली.राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला.त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले.त्यांनी 6 मार्च इ.स. 1993 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सुत्रे हाती घेतली.

विधानसभा, चौथी खेळी
पवारांची मुख्यमंत्रीपदाची चौथी कारिकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली.ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, 12 मार्च इ.स. 1993 रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले.त्यात 257 लोक ठार तर 600 हून अधिक लोक जखमी झाले. 30 सप्टेंबर इ.स. 1993 रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले.या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले. प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले.तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठिशी घालत आहे असा आरोप झाला.जळगाव येथील सेक्स स्कँडल मध्ये अनेक तरूणींवर लैंगिक अत्याचार झाले.त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला. 23 नोव्हेंबर इ.स. 1994 रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला.त्यात चेंगराचेंगरी होऊन 123 लोक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला.

राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च इ.स. 1995 मध्ये निवडणुका होणार होत्या.त्या निवडणुकींच्या तिकिटवाटपात काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली.अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अधिक्रुत उमेदवारांविरूध्द अपक्ष म्हणून निवडणुक लढवली.

जनतेत सरकारविरूध्द वाढलेली नाराजी आणि मोठया प्रमाणावर झालेली बंडखोरी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले.काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.शिवसेना-भाजप युतीस 288 पैकी 138 जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास 80 जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा 14 मार्च इ.स. 1995 रोजी शपथविधी झाला.

दिल्लीची तिसरी फेरी
इ.स. 1996 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते. इ.स. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्टीय राजकारणात उतरले. जून इ.स. 1997 मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरूध्द निवडणुक लढवली पण त्यांचा पराभव झाला.

इ.स. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला.त्यामुळे शिवसेना-भाजप विरोधी मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने 48 पैकी 37 जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केले.शिवसेना-भाजप युतीला 10 जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर शरद पवार 12 व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

12 वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे इ.स. 1999 मध्ये पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की,13 व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे.काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्या तिघांनी म्हटले,’उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या 98 कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेर जन्म झालेली कोणतीही व्यक्ती सरकारचे नेत्रुत्व करणे योग्य होणार नाही.कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडीत आहे.’त्या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार,पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले.

राष्ट्रवादी
त्यानंतर 10 जून इ.स. 1999 रोजी शरद पवारांनी त्यांच्या ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली. इ.स. 1999 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

इ.स. 2004 मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. 22 मे इ.स. 2004 मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. 29 मे इ.स. 2009 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. जुलै इ.स. 2010मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली आहे.

क्रिकेट
राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. 29 नोव्हेंबर इ.स. 2005 रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. 1 जुलै इ.स. 2010 रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.

शिक्षण
पवारांचा शिक्षणक्षेत्राशीही सक्रिय संबंध आहे. त्यांनी ज्या शिक्षणसंस्थांच्या कामात सहभाग घेतला आहे, त्यातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्था खालीलप्रमाणे -

विद्या प्रतिष्ठान, बारामती (इंग्लिश मजकूर)
कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती (इंग्लिश मजकूर)
रयत शिक्षण संस्था, सातारा (इंग्लिश मजकूर)
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी, पुणे (इंग्लिश मजकूर)
शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव, बारामती (इंग्लिश मजकूर)


चरित्रे आणि आत्मचरित्रसंपादन
लोकनेते शरदराव पवार (लेखक - राम कांडगे)
डहरीरव झरुरी - A चरीी ङशरवशी (लेखक - दीपक बोरगावे)
शरद पवार यांचे ’लोक माझे सांगाती’ नावाचे मराठी आत्मचरित्र आहे.

Post a Comment

0 Comments