मुंबई मेट्रोची दरवाढ तूर्तास टळली

मुंबई: मुंबईकरांना हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. कारण मुंबई मेट्रोची दरवाढ महिनाभरासाठी टळली आहे. एमएमआरडीएच्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत मेट्रोची दरवाढ करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. याप्रकरणाची सुनावणी आता 29 जानेवारीला होणार आहे.

त्याआधी मेट्रोने भाववाढ करु नये असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे काहीकाळासाठी मुंबईकरांच्या डोक्यावरची भाववाढीची टांगती तलवार दूर झाली असं म्हणावं लागेल.

मेट्रो तिकीट दर निश्चिती समितीने केलेल्या शिफारसींनुसार मेट्रोला तिकीट दरांमध्ये 10 ते 110 रुपयांपर्यंत दरवाढ करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, एमएमआरडीएने त्यावर आक्षेप घेत हायकोर्टात धाव घेतली आहे

Post a Comment

0 Comments