पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर-(प्रतिनिधी) दि.22 डिसेंबर 2015
अखेर पंढरपूर च्या लिंकरोडवरील जड व अवजड वाहतुक बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेसाो यांनी दिला असून ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या प्रयत्नांना आज अखेर यश मिळाले आहे. जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयाचे उपनगरातील नागरिकांमधून स्वागत होत आहे.
आज दि. 18 डिसेंबर 2015 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कामती, मोहोळ, टेंभूर्णी, सांगोला, मंगळवेढा, वेळापूर व पंढरपूर शहर व तालुका पोलिस ठाण्याचे सर्व प्रभारी अधिकार्यांना वरील आदेशाबाबतचे पत्र पाठविलेले आहे. या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की, ‘‘पंढरपूरच्या बाह्यवळण मार्गावर वाहतुक कोलमडूनर्मिाण होणारी वाहतुकीची कोंडी टाळणेसाठी या मार्गावरुन जाणारी जड-अवजड-मल्टीअॅक्सल वाहने यामध्ये ट्रॉलीसह ट्रेलर, कंटेनर, ट्रॅक्टर व गॅस कटर (ट्रॅक्टर ट्रॉली वगळून) आदी वाहनांना पंढरपूर बाह्यवळण (लिंक रोड) मार्गावरून प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.
पंढरपूर येथील लिंकरोडवरील जड व अवजड वाहतुक बंद केल्यामुळे यापुढे जड व अवजड वाहनांना पर्यायी मार्ग खालील प्रमाणे असतील.मोहोळ मधील शिवाजी चौक येथील वाहतुक मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला किंवा शेटफळ-मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला अशी वळविण्यात येईल. मोहोळ शेटफळ चौक येथील वाहतुक शेटपळ-टेंभूर्णी-अकलुज-वेळापूर-महूद-सांगोला किंवा शेटफळ-मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला अशी वळविण्यात येईल.
कामती, कुरुल चौक येथील वाहतुक कुरुल-कामती-मंगळवेढा-सांगोला-महूद-वेळापूर-अकलुज-किंवा-कुरुल-मोहोळ-शेटफळ-टेंभूर्णी-अकलुज-वेळापूर अशी वळविण्यात येईल.
टेंभूर्णी, वेणेगाव फाटा येथील वाहतुक वेणेगाव फाटा-टेंभूर्णी-अकलुज-वेळापूर-महुद-सांगोला किंवा वेणेहाव फाटा-शेटफळ-मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला अशी वळविण्यात येईल.
वेळापूर, साळमुख चौक येथील वाहतुक साळमुख चौक-महुद-सांगोला-मंगळवेढा-कामती किंवा सालमुख चौक- वेळापूर-टेंभुर्णी-शेटफळ-मोहोळ अशी वळविण्यात येईल.
सांगोला, महुद चौक येथील वाहतुक महुद चौक-सांगोला-मंगळवेढा-कामती-मोहोळ-किंवा महुद चौक-वेळापूर-टेंभूर्णी-शेटफळ-मोहोळ अशी वळविण्यात येईल.
सांगोला, पंचायत समिती येथील वाहतुक सांगोला-मंगळवेढा-कामती-मोहोळ-शेटफळ-टेंभूर्णी-किंवा सांगोला-महुद-वेळापूर-टेंभूर्णी-शेटफळ-मोहोळ अशी वळविण्यात येईल.
मंगळवेढा, मंगळवेढा नाका बायपास येथील वाहतुक मंगळवेढा-कामती-मोहोळ-शेटफळ-टेंभूर्णी किंवा मंगळवेढा-सांगोला-महुद-वेळापूर-टेंभुर्णी अशी वळविण्यात येईल.
यासाठी कामती, मोहोळ, टेंभूर्णी, सांगोला, मंगळवेढा व वेळापूर येथील वरील सर्व साईटचे ठिकाणी नागरिकांना स्पष्ट दिसतील अशअ रितीने सुचना फलक लावण्यात यावेत, या सर्व ठिकाणी पोलिस कर्मचारी नेमणूक करावेत तसेच बॅरेकेटस् वगैरे लावून या अधिसुचनेची अंमलबजावणी परिणामकारकपणे करावी असा आदेश देण्यात आला आहे.
याचा अवलंब प्रायोगिक तत्वावर दि. 20-12-2015 ते 4/1/2015 पर्यंत करावयाचा आहे.


0 Comments