लग्नात वर दारु पिऊन आला, वधूने वरात माघारी पाठवली

कानपूर : स्वत:च्या लग्नात दारु पिणं येणं वराला महागात पडलं. कानपूरच्या सिघौल गावात वरात पोहोचली होती, पण वर दारुच्या नशेत झिंगू लागला. हे समजताच वधूने लग्नाला नकार दिला आणि वरात माघारी पाठवली.

पोलिसांच्या माहितीनुसार, वधूच्या घराबाहेर वरात दाखल झाली. यानंतर वरातीचं स्वागतही करण्यात आलं. काही विधीही करण्यात आल्या. यानंतर वर वधूच्या गळ्यात वरमाला टाकण्यासाठी सज्ज झाला. पण मद्यधुंद अवस्थेत असलेला वर झिंगायला लागला.

हे पाहून वधूला समजलं की, तिचा होणारा नवरा दारु पिऊन आला आहे. त्यामुळे तिने लग्न करण्यास मनाई केली. यानंतर विवाहस्थळी जोरदार वाद झाला. याची माहिती मिळताच पोलिसही तिथे पोहोचले. वराचे नातेवाईकांनी वधूला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतू वधू तिच्या निर्णयावर ठाम राहिले.

यानंतर वधू-वराच्या नातेवाईकांमध्ये चर्चाही होती. पण देण्या-घेण्याचं सामान दोन्ही पक्षांकडून परत करण्यात आलं. मात्र या घटनेनंतर संपूर्ण परिसरात याची चर्चा रंगली आहे.


Post a Comment

0 Comments