पंढरपूर (प्रतिनिधी):-दि.15 जुन 2016 रोजी पंढरपूर शहरातील नगरपरिषदेच्या सर्व शाळा सुरु झाल्या. सर्व पालकांच्या सोबत आज नगरपरिषदेच्या पंढरीतील विविध शाळेत विद्यार्थी हजर झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी गुलाबपुष्प देऊन केले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई ङ्गुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने गणवेश तसेच शालेय पुस्तकांसह शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्व पटवुन दिले.
यावेळी जेष्ठ नगरसेविका श्रीमती लक्ष्मी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, शिक्षण समिती सभापती रेहाना बोहरी, पाणीपुरवठा सभापती विक्रम शिरसट, प्रशासकीय अधिकारी मोरे, बंटी वाघ, मुख्याध्यापक, शिक्षक व शालेय कर्मचारी वृंद उपस्थित होते.


0 Comments